Success Story: १०वीत नापास; सलग ६ वेळा सरकारी परीक्षेत फेल; वडिलांच्या एका सल्ल्यामुळे झाले IPS; ईश्वर लाल गुर्जर यांचा प्रवास

Success Story of IPS Ishwar Lal Gujar: आयपीएस ईश्वर लाल गुर्जर यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आयपीएस ईश्वर लाल गुर्जर यांना एकदा नाही तर सहा वेळा अपयश आले होते. तरीही त्यांनी बार मानली नाही.
Success Story:
Success Story:Saam Tv
Published On
Summary

IPS ईश्वर लाल गुर्जर यांचा प्रेरणादायी प्रवास

सलग ६वेळा अपयश तरीही हार मानली नाही

दोनदा क्रॅक केली यूपीएससी

आयुष्यात प्रत्येकालाच अपयश येते. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते. नेहमी आपले प्रयत्न सुरु ठेवायचे. आयुष्यात एक दिवस नक्कीच यश मिळेल. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार. असंच काहीसं आयपीएस अधिकारी ईश्वर लाल गुर्जर यांनी केलं. त्यांना आयुष्यात अनेकदा अपयश आले तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी शेवटी यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story:
Success Story: वडिलांचे छत्र हरपलं, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक; IAS दिव्या तंवर यांचा प्रवास

आयपीएस ईश्वर लाल गुर्जर हे १०वीत नापास झाले होते. त्यानंतर त्यांना सलग ५ सरकारी परीक्षांमध्ये अपयश आले तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले. त्याचं यश त्यांना मिळालं.

शिक्षण सोडण्याचा केला होता विचार, वडिलांमुळे झाले आयपीएस

ईश्वर गुर्जर हे १०वीत नापास झाले होते. त्यांना दहावीत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना मोलाचा सल्ला दिल आणि तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

ईश्वर गुर्जर यांचे वडिल शेतकरी आहेत. त्यांनी ईश्वर यांना सांगितले की, अभ्यासाला घाबरण्याचे काही काम नाही. तुला आज शिक्षणाचे महत्त्व माहित नसेल परंतु भविष्यात नक्कीच महत्त्व समजेल.

यानंतर ईश्वर यांनी पुन्हा एकदा दहावीची परीक्षा दिली. त्यांना ५४ टक्के गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी १२वी पास केली. त्यांनी महर्षि दयानंद युनिव्हर्सिटी अजमेर येथून बॅचरल डिग्रीप्राप्त केली.

सलग ६ वेळा अपयश तरी हार मानली नाही

ईश्वर हे १०वीत पास झाले. त्यानंतर सलग ६ वेळा सरकारी परीक्षेत फेल झाले. त्यांनी अनेक परीक्षा दिल्या होत्या. यूपीएससी परीक्षेत ते सलग तीनदा अपयशी ठरले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही.

Success Story:
Success Story: बी.टेकनंतर बँकेत नोकरी, पुन्हा UPSC ची तयारी; IPS शांभवी मिश्रा यांचा प्रवास

सहा वेळा सरकारी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांनी रीट परीक्षा दिली. ते शिक्षक बनले. त्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी २०२१ मध्ये RAS परीक्षा दिली. त्यानंतर ते SDM बनले. यानंतर २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यानंतर ते IRS ऑफिसर बनले. परंतु त्यांचे स्वप्न आयपीएस व्हायचे होते. त्यांनी २०२३ मध्ये पुन्हा यूपीएससी (UPSC)परीक्षा पास केली आणि ते आयपीएस अधिकारी बनले.

Success Story:
Success Story: जिद्द! घर, कुटुंब सांभाळत लग्नानंतर क्रॅक केली UPSC; IAS बी चंद्रकला यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com