

श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक
मोबाईल नंबर - 9860187085
राशीभविष्य, दिनांक १० मार्च २०२६
मेष : आज दिवसभर कामात व्यग्र राहाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ : तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसू शकतात.
मिथुन : कार्यालयात वरिष्ठ सहकाऱ्याकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. सहकाऱ्याच्या मदतीने कामे पूर्ण होतील.
कर्क : जुने मित्रांच्या मदतीने समस्या सुटतील. जुने कामे पूर्ण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मोठा खर्च टाळावा लागेल.
सिंह : तुम्हाला आज कामात नवीन जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.
कन्या : कामातील मेहनतीचा चांगला परिमाण दिसेल. आज दिवस नव्या ऊर्जेसह सुरू होईल.
तुळ : घाई घाईत कोणताही निर्णय घेऊ नये.तसेच आरोग्याबाबत फारशी चिंता करू नये.
वृश्चिक : तुमच्या कामात प्रगती दिसेल. कुटुंबासोबत संवाद साधल्याने जटिल समस्या सुटतील.
धनु : कार्यालयात केलेल्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता. जुन्या मित्रांच्या भेटीने मन सुखावेल.
मकर :नवीन योजना आखण्यास सुरुवात कराल. आर्थिक स्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ : आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आजचा दिवस शांत राहू शकतो.
मीन : शेजारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने काम सोपे होईल. कामातील मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.