Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, जर्मनीतील नोकरी सोडली; UPSC दिली; आधी IPS नंतर IAS; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Success Story of IAS Garima Agarwal: आयएएस गरिमा अग्रवाल यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी सुरुवातीला इंजिनियरिंग केलं, त्यानंतर परदेशात नोकरी केली. परदेशातील नोकरी धुडकावून त्या भारतात परतल्या अन् यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

IAS गरिमा अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

आयआयटीमधून इंजिनियरिंग केलं

परदेशातील नोकरी सोडली

मायदेशी परतल्या अन् यूपीएससी दिली

पहिल्या प्रयत्नात IPS तर दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी

आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेतात. काहीजण स्वप्नांना पाठलाग करत परदेशातदेखील जातात. परंतु परदेशात कितीही राहिलं तरीही मायदेशाची ओढ प्रत्येकालाच असते. स्वतः च्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. असंच काहीसं गरिमा अग्रवाल यांनीदेखील केलं. त्यांनी परदेशातील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा दिली. त्या आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

गरिमा अग्रवाल या मूळच्या मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी. त्यांचा जन्म बिझनेसमॅनच्या कुटुंबात झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना दहावीत ८९ टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत ९२ टक्के गुण मिळाले होते.

गरिमा अग्रवाल यांनी सुरुवातीला इंजिनियरिंग केले. त्यानंतर आयपीएस आणि आयएएस अधिकारी झाल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी परदेशातील नोकरीदेखील सोडली. आयएएस गरीमा यांचा हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.

१२वी नंतर गरिमा अग्रवाल यांनी देशातील सर्वात अवघड परीक्षा जेईई क्रॅक केली. त्यानंतर त्यांनी इंजिनियरिंग केले. त्यांनी आयआयटी हैदराबाद येथे अॅडमिशन घेतले. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्याच जोरावर त्यांना जर्मनीत इंटर्नशीप मिळाली होती. परंतु त्यांना परदेशात नोकरी करायची नव्हती. त्यामुळे त्या पुन्हा मायदेशी म्हणजे भारतात आल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

गरिमा यांनी आपल्या मेहनतीने यश मिळवले आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. यावेळी त्यांना २४०वी रँक प्राप्त केली. त्यावेळी त्यांनी आयपीएस पोस्टिंग मिळाली. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आयपीएस ट्रेनिंग करता करता यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवली.

गरिमा यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी दुसऱ्या प्रयत्नात त्यांना ४०वी रँक मिळाली. त्यांनी २०१८ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा एकदा यूपीएससी क्रॅक केली. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान; पुन्हा नव्याने अर्ज करा, OBC संघटनेला कोर्टाच्या सूचना

'माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल...' निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ, पुण्यात खळबळ

Sunita Ahuja: 'गोविंदा त्याच्या सर्व हिरोईनसोबत फ्लर्ट...'; सोनाली बेंद्रेच्या शोमध्ये पत्नी सुनीताने केला धक्कादायक खुलासा

Pune : पुण्यातील वारजे पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण | पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT