Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणी म्हशी राखल्या, बारावीतच लग्नासाठी दबाव, पण जिद्दीनं क्रॅक केली UPSC; आज सी वनमथी आहेत IAS ऑफिसर

IAS Vanmathi Success Story: स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली तर स्वप्न साकार होतात. असंच स्वप्न सी वनमथी यांचे पूर्ण झाले आहे.

Siddhi Hande

कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर मात करुन जी व्यक्ती सातत्याने प्रयत्न करते, तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. असंच यश केरळच्या सी वनमती यांना मिळाले आहे. सी वनमथी यानी खूप बिकट परिस्थितीत आयुष्य जगत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

सी वनमथी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती. परंतु बिकट परिस्थिती असल्याने त्यांना लहानपणापासूनच काम करावे लागेल. (Success Story)

सी वनमथी यांच्यावर तरुण वयात लग्न करण्यासाठी दबावदेखील टाकण्यात आला होता. परंतु त्यांनी स्वतः च्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आयएएस होण्यासाठी कठोर परिश्रम केले.

सी वनमाथी या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील कॅब ड्रायव्हर होते. त्यांच्या पगारात संपूर्ण घर चालवणे अशक्य होते. बिकट परिस्थिती असतानादेखील त्यांच्या आईवडिलांनी वनमथी यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. (IAS Vanmathi Success Story)

सी वनमती या लहान असताना म्हैस चरायला घेऊन जायच्या. त्यांच्या घरात मुलींना बारावीनंतर शिक्षण दिले जात नव्हते. त्यामुळे बारावी झाल्यावर लगेचच त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्या आईवडिलांची मुलीला शिकवण्याची इच्छा होती. परंतु तिच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर दबाव आणला. परंतु वनमथीने त्यांना लग्न करण्यासाठी नकार दिला. त्यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

वनमथी यांनी खूप मेहनत करुन यूपीएससी परीक्षा दिली. २०१५ च्या यूपीएससी परिक्षेत १५२ रँक मिळवला. (UPSC Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 New Rule:Ben Stokes आयपीएलचे पुढील २ हंगाम खेळू शकणार नाही! काय आहे BCCI चा नवीन नियम?

Shriya Pilgaonkar: श्रियाचं सुंदर रूप; पाहताच नजर लागेल

Sambhajinagar News : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच ठाकरे गटाला मोठी खिंडार; २ माजी नगरसेवकांसह १२ जणांनी दिले राजीनामे

सलमान खान नसताना 'Bigg Boss'मध्ये होणार ड्रामा अन् फूल ऑन ॲक्शन, भाईजान सोडून 'हे' सेलिब्रिटी गाजवणार Weekend Ka Vaar

IND vs SA टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज

SCROLL FOR NEXT