Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १ मार्कमुळे पहिली संधी हुकली, पण दुसऱ्यांदा IAS झालाच; अर्पित गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Arpit Gupta: अर्पित गुप्ता यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. पहिल्या प्रयत्नात ते फक्त १ गुणामुळे इंटरव्ह्यूपर्यंत पोहचू शकले नव्हते. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

IAS अर्पित गुप्ता यांचा प्रवास

फक्त १ गुणामुळे फेल

दुसऱ्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही संघर्ष असतो.संघर्ष आपल्याला खूप काही शिकवतो. त्यामुळे संघर्ष पाहून कधीच हार मानायची नाही. असंच काहीसं अर्पित गुप्ता यांनी केलं. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्याचसोबत कुटुंबातदेखील दुःखद घटना घडली होती. त्यांच्या चुलत भावाचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांना खूपच झटका बसला होता. तरीही त्यांनी हे दुःख पचवून पुन्हा एकदा तयारी केली.

अर्पित हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गोरखपुरचे रहिवासी. त्यांनी ८वपर्यंतचे शिक्षण गावातच केले. यानंतर आयआयची रुडकीमधून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी सिविल परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते दिल्लीला गेले.

२०२० मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. प्रिलियम्स परीक्षेदरम्यान त्यांची तब्येत खराब झाली होती. परंतु त्यांनी या परिस्थितीतही परीक्षा दिली. त्यांना मेन्स परीक्षेदरम्यान कांजण्या आल्या होत्या. तरीही त्यांनी परीक्षा दिली.

जेव्हा मेन्स परीक्षेचा निकाल आला तेव्हा अर्पित यांना झटका बसला. फक्त एका गुणामुळे त्यांनी परीक्षा पास केली नाही. एका मार्कमुळे ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहचू शकले नाही. परंतु त्यांनी तरीही हार मानली नाही.

अर्पित यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. या काळात त्यांच्या चुलत भावाचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तरीही त्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढला. पुन्हा एकदा अभ्यासा सुरुवात केली. त्यांनी ५४रँक प्राप्त केली. यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. आयुष्यात अपयश येत राहील परंतु त्यावर मात करता यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT