Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! फक्त २२ व्या वर्षी IAS; अनन्या सिंह यांची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Ananya Singh: अनन्या सिंह यांनी वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवले आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकदा खूप कमी वयात आपल्याला यश मिळते तर अनेकदा खूप वर्ष वाट पाहावी लागते. परंतु असंच काहीसं अनन्या सिंह यांच्यासोबत झालंय. अनन्या सिंह या वयाच्या २२ व्या वर्षी IAS अधिकारी झाल्या. (Success Story OF IAS Ananya Singh)

अनन्या सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी खूप कमी वयात आयएएस ते चीफ सेक्रेटरी पोस्टपर्यंत पद मिळवले.

अनन्या सिंह या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी प्रयागराज येथील सेंट मेरी कॉन्वेंट स्कूलमधून अभ्यास केला. १० वीत अनन्य सिंहला ९६ टक्के गुण मिळाले. १२ वीत ९८.२५ टक्के गुण मिळाले. त्यांनी १२वी नंतर इकोनॉमिक्स ऑनर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. (IAS Success Story)

अनन्या सिंह यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी बनायचे होते. त्यांनी ग्रॅज्युएशनंतर यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्या रोज ७-८ तास अभ्यास करायच्या.यूपीएससी परिक्षेची तयारी करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आपला वेळ नेहमी अभ्यासासाठी खर्च केला. त्यांनी यूपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी पुस्तकांची लिस्ट बनवली होती. त्यातून ते अभ्यास करायचे.

यूपीएससी परिक्षेची तयारी करताना अनन्या यांनी स्वतः च्या नोट्स तयार केल्या होत्या. स्वतः च्या नोट्स तयार केल्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चांगले लक्षात राहते. त्याचसोबत रिवीजनदेखील होते. अनन्या सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २०१९ मध्ये ५१ वी रँक मिळवत आयएएस पदाला गवसणी घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT