Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: विराट कोहलीकडून प्रेरणा, कधीही न हारण्याची जिद्द, पहिल्याच प्रयत्नात तिसरी रँक, वाचा IAS अनन्या रेड्डी यांचा प्रवास

Success Story of IAS Donuru Ananya Reddy: आयएएस अनन्या रेड्डी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या विराट कोहलीकडून कधीही हार मानायची नाही, हे शिकल्या.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीसोबतच आपण कोणाचा तरी प्रवास बघून प्रेरणा घेतो. त्या व्यक्तीकडे बघून आपल्याला खूप अभिमान वाटतो. त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपण प्रयत्न करतो. कितीही अपयश आले तरीही मागे हटायचे नाही, असं ठरवतो. असंच काहीसं आयएएस डोनुरु अनन्या रेड्डी यांच्यासोबत झालं. त्यांनी स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडून प्रेरणा घेऊन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

विराट कोहलीकडून प्रेरणा (Inspired By Virat Kohli)

डोनुरु अनन्या रेड्डी यांनी यूपीएससी परीक्षेत तिसरी रँक प्राप्त केली. त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी विराट कोहलीकडून प्रेरणा घेतली आहे. त्यांनी सांगितले होते की, विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. त्यांच्याकडे हार मान्याची वृत्तीच नाहीये.अनुशासन आणि विराटचे काम ही एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळेच ते माझ्यासाठी प्रेरणा आहेत.

अनन्या यांनी बॅचरल डिग्री प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या होत्या. त्यांनी स्वतः साठी घर भाड्याने घेतले होते. त्या दिवसाला १२ ते १४ तास अभ्यास करायच्या.

१२- १४ तास अभ्यास

अनन्या या अर्धा दिवस तर अभ्यासात घालवायच्या. या तणावपूर्ण वातावरणात थोडं रिलॅक्स होण्यासाठी त्या क्रिकेट बघायच्या. त्यांना विराट कोहलीची शिस्त आणि कामाप्रती असलेली श्रद्धा खूप आवडायची. यातूनच प्रेरणा घेत त्यांनी कधीही हार मानायची नाही असं ठरवलं. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

अनन्या यांनी अभ्यास करत करत इतर गोष्टींवरदेखील फोकस केला. त्यांनी अभ्यासासोबत परीक्षेचा पॅटर्न आणि चांगल्या पुस्तकांमधून अभ्यास केला. याचाच त्यांना फायदा झाला. त्यांनी खूप कमी वयात हे यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT