Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १० ते ५ नोकरी, रात्रभर अभ्यास, अंगणवाडी सेविकाचा मुलगा BPSC परिक्षेत आला पहिला; उज्जवल यांची सक्सेस स्टोरी

Success Story OF BPSC Topper Ujjawal Kumar: अंगणवाडी सेविकेच्या मुलाने बीपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. उज्वल कुमार उपकार यांनी १ रँक मिळवत कुटुंबियांचे नाव मोठे केले आहे.

Siddhi Hande

मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी बीपीएससीचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये ४७० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवे. या परिक्षेत सीतामढी येथील रहिवासी असणाऱ्या उज्जवल कुमार उपकार यांनी पहिली रँक मिळवली आहे. ते गौरोल येथील ब्लॉक कल्याण अधिकारी पदावर आधीच कार्यरत होते.

प्रशासकीय सेवेत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पूर्वीपासूनच खूप अभ्यास केला. त्यांनी हिंदी माध्यनातून परीक्षा दिली होती.ते आता डीएसपी झाले आहेत.

उज्जवल कुमार उपकार यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिली रँक मिळवला आहे. उज्जवल सध्या वैशाली जिल्ह्यातील गोरौळ येथे ब्लॉक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

उज्जवल हे मूळचे नानपूरमधील रायपूर गावचे रहिवासी. त्यांचे वडिल सुबोध ठाकूर हे खाजगी शाळेत शिक्षण आहेत. तर आई गुडिया कुमारी या अंगणवाडी सेविका आहे. सुरुवातीचे शिक्षण त्यांचे शाळेतच झाले. त्यानंतर त्यांनी बरियापूरमधून कॉलेजचे शिक्षण केले. त्यानंतर एनआयटी उत्तराखंड येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. दिल्लीत राहून त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयार केली.

उज्जवल यांनी हिंदी भाषेत बीपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी याआधीही बीपीएससी परीक्षा दिली होती. तेव्हा त्यांना ४९६ रँक मिळाली होती. परंतु त्यांनी हार न मानता तयारी सुरु ठेवली.

उज्जवल हे सकाळी १० ते ५ नोकर करायचे. यानंतर रात्री १० ते सकाळी २ या वेळेत परिक्षेची तयारी करायचे. त्यांनी एकदा यूपीएससी परीक्षादेखील दिली होती. आधीच सरकारी नोकरी असताना त्यांनी पुन्हा बीपीएससी परीक्षा दिली. ते आता डीएसपी म्हणून कार्यरत होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT