Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: हलाखीच्या परिस्थितीतही जग जिंकलं; ठाण्याच्या मेकॅनिकची लेक २२ व्या वर्षी हवाई दलात ऑफिसर

Success Story Of IAF Officer Sejal Yadav: ठाण्याच्या मेकॅनिकच्या लेक वयाच्या २२ व्या वर्षी हवाई दलात ऑफिसर झाली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना तिने हे घवघवीत यश मिळवले आहे.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर मात करावी, असं नेहमीच सांगितले जाते.असंच काहीसं ठाण्याच्या २२ वर्षीय सेजल यादव हिने केलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची तरीही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेजलने खूप मेहनत घेतली. सेजलची भारतीय हवाई दलात ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. (Success Story)

सेजल यादव ही मूळची ठाण्याची आहे. तिचे वडिल हे मेकॅनिक आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. या परिस्थितीतही तिने खूप मेहनत केली आणि आज तिच्या कष्टायचे फळ तिला मिळाले आहे. ती हवाई दलात ऑफिसर म्हणून रुजू होणार आहे. सेजलने हवाई दलाच्या एंट्री लेवल परिक्षेत ४६ वी रँक मिळवली. त्यानंतर तिचा प्रवास सुरु झाला. आज ती वैमानिक अभियांत्रिकी विभागात नोकरी मिळवली. (Success Story Of Indian Air Force Officer)

सेजल ही खूप लहान घरात कुटुंबासोबत राहते. तिचे वडिल गॅरेज मेकॅनिक आहेत. तर आई गृहिणी आहे. सेजलला हवाई दलात काम करायचे नव्हते. तिला डॉक्टर व्हायचे होते. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने तो निर्णय बदलला. तिला परिक्षेतदेखील चांगले गुण मिळाले होते. परंतु तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ती स्वप्न पूर्ण करु शकली नाही. त्यामुळे तिने इंजिनियरिंग करण्याचा निर्णय घेतला. याच काळात तिला सैन्यात काम करण्याची संधी आहे, हे समजले. त्यामुळे तिने कॉलेजमध्ये एनसीसी जॉइन केले. त्यानंतर तिला हवाई दलात काम करण्याची संधी मिळाली.

सेजलने हवाई दलाची Common Admission Test (AFCAT) पास केली. ती दिवसभर या परिक्षेचा अभ्यास करायची. ती फक्त २ तास झोपायची. कॉलेजला जाण्याआधी फार कमी वेळ झोपायची. तिने अनेक स्कॉलरशिप मिळवल्या. त्यातून तिला शिक्षणासाठी सपोर्ट मिळायला, असं तिच्या वडिलांनी सांगितले. सेजल ही सर्वात तरुण ऑफिसर असेल. तिने खूप कमी वयात चांगले काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT