Success story X
बिझनेस

Success Story : हाईटला फाईट देत आदिवासी तरुण झाला अधिकारी, नंदूरबारच्या विजयने गाठली BMCत अधिकारी पदाची उंची

Nandurbar News : नंदूरबाद जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विजय पावरा या आदिवासी तरुणाची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Yash Shirke

सागर निकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील विजय पावरा या आदिवासी तरुणाने मोठे यश संपादन केले आहे. परिस्थितीवर मात करत त्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रगती केली आहे. विजयची उंची फक्त ३ फूट आहे. मात्र याची अडसर त्याला कधीही ठरली नाही. जिद्दीने अभ्यास करत तो बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी बनला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यात विजय पावराचे गाव आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला विजय बालपणापासूनच अपंग आहे. त्याची उंची ही तीन फुटाची आहे. अपंगत्व आणि हालाखीची परिस्थिती यांवर मात करुन विजयने यश प्राप्त केले आहे. इतक्या कमी उंचीचा विजय पावरा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच अधिकारी ठरला आहे.

मला माझ्या वाटचालीत कधीही माझ्या कमी उंचीमुळे न्यूनगंड वाटला नाही, कशाचीही भीती वाटली नाही. मी उंचीने कमी आहे याची कधीच स्वत:ला जाणीव करुन दिली नाही. मी नेहमी माझ्या अभ्यासावर भर दिला आणि यश माझ्या पदरात पडले. आज माझी निवड झाली आहे. मला अत्यंत आनंद होत आहे, असे वक्तव्य विजय पावराने केले आहे.

६ डिसेंबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक अधिकारी या पदासाठी परीक्षा झाली होती. विजय पावराने अभ्यास करुन ही परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल हाती आला असून महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी पदासाठी त्याची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू

Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

शेकाप-भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले, तरीही शिंदेसेना जिंकली; विजयाचा झेंडा फडकवत प्रतिष्ठा राखली

SCROLL FOR NEXT