Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; २२ व्या वर्षी IAS अधिकारी, मोनिका यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Monica Yadav UPSC Success Story: यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे.यूपीएससी पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेकदा अपयशदेखील येते. परंतु मोनिका यादव यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

मोनिका यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाल्या प्रशासकीय अधिकारी

जर तुम्ही सतत प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकतात. वाटेत कितीही अडथळे आले ती त्यावर मात करु शकतात. असंच काहीसं मोनिका यादव यांनी केलं. त्यांनी वयाच्या केवळ २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

वडील RAS अधिकारी

मोनिका यांचे वडील हरफूल सिंह यादव हे आरएएस अधिकारी आहेत. त्यांच्यामुळेच त्यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांना नेहमीच नागरी सेवा परीक्षा देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अवघ्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी ४०३ रँक प्राप्त केली. आयएएस झाल्यानंतरही त्यांनी राजस्थान नागरी सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना ९३ रँक मिळाली.

मोनिका यांनी नेट, जेआरएफ आणि सीए या सर्वात कठीण परीक्षादेखील पास केल्या. त्या लखनऊ येथे इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ट्रेनिंग घेत असताना त्यांना सर्वोकृष्ट कामगिरीचा पुरस्कारही मिळाला.

आयएएस अधिकारी असूनही मोनिका या नेहमी लोकांच्या संपर्कात असतात. त्या सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे पोस्ट करत असतात. त्यांचे वडील आरएएस अधिकारी तर आई गृहिणी आहेत. मोनिका यादव यांचे पतीदेखील आयएएस अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी पास करणाऱ्या सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी मोनिका एक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT