Success Story IPS Uday Krishna Reddy Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं; आजीने भाजी विकून मोठं केलं, UPSC क्रॅक करत कॉन्स्टेबल उदय कृष्णा रेड्डी झाले IPS अधिकारी

Success Story IPS Uday Krishna Reddy: आयपीएस उदय कृष्णा रेड्डी यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी मोठ्या मेहनतीने हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

IPS उदय कृष्णा रेड्डी यांचा प्रवास

५ वर्षांचे असताना आईवडिलांचे छत्र हरपलं

आजीने भाजी विकून केलं मोठं

पोलिस कॉन्स्टेबल झाले

अपमानाचा बदला घेण्यासाठी दिली UPSC

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही संघर्ष असतो. कोणीही लगेच कोणतेही प्रयत्न न करता यशस्वी होत नाही. यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. आपल्यातच परिस्थिती बदलण्याची ताकद असते. फक्त त्यासाठी इच्छाशक्ती आणि मेहनत करणे गरजेचे आहे. असंच काहीसं आयपीएस उदय कृष्ण रेड्डी यांनी केलं. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी थेट यूपीएससी परीक्षा दिली आणि पासदेखील केली.

लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने भाजी विकून मोठं केलं

आयपीएस उदय कृष्णा रेड्डी यांचा प्रवास खूपच खडतर आहे. वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी त्यांनी आपल्या आईला गमावलं. काही दिवसानंतर त्यांच्या वडिलांचेही छत्र हरपलं. यावेळी त्यांच्या आजीने त्यांना लहानाचं मोठं केलं. त्यांची आजी भाजी विकायची. यातून त्यांचा घरखर्च चालायचा. त्यांच्या आजीने त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाही. त्यांनान खूप सपोर्ट केला.

डॉक्टर होण्याचे स्वप्न पण झाले पोलिस

उदय यांनी डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी मेडिकल लॅब टेक्निशियनचे शिक्षणदेखील घेतले होते. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पुढे शिकू शकले नाही. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अभ्यासासोबत सरकारी नोकरीची तयारी केली. त्यांची पोलिस कॉन्स्टेबल म्हणून निवडदेखील झाली.

एका अपमानाने बदलले जीवन

पोलिस कॉन्स्टेबल पदावर ते कार्यरत होते. मात्र, त्यांचा अनेकदा अपमान व्हायचा. २०१८ मध्ये एका सिनियर ऑफिसरने त्यांचा अपमान केला होता. त्या क्षणी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी दृढ निश्चय केला. त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

उदय कृष्ण रेड्डी यांनी २०२३ मध्ये पहिल्यांचा यूपीएससी (UPSC) दिली आणि पासदेखील केली. त्यांना ७८० रँक प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी दिली यावेळी त्यांना ३५० रँक मिळाली. यानंतर ते आयपीएस अधिकारी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच; मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

French fries Recipe : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, एक घास खाताच महागड्या हॉटेलची चव विसराल

Maharashtra Live News Update खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने मच्छीमार बोट अडकली

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहच्या दिवशी ही गोष्ट नक्की करा, बदलेल तुमचं नशीब

SCROLL FOR NEXT