Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आधी पत्रकार, शिक्षक मग IPS; पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही कोचिंगशिवाय पास केली UPSC

Success Story IPS Preeti Chandra: आयपीएस प्रीति चंद्रा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय अभ्यास केला होता.

Siddhi Hande

IPS प्रीति चंद्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास

कोचिंगशिवाय केला होता अभ्यास

यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. दरम्यान, यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु कितीही वेळा अपयश आले तरीही हार मानायची नसते. परंतु अनेकजण पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास करतात. असंच काहीसं प्रीति चंद्रा यांच्यासोबत झालं. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

प्रीति चंद्रा यांचा जन्म १९७९ मध्ये सीकर येथील एका लहान गावात झाला. त्यांचे वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि समाजसेवक होते. प्रीति यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून केले. त्यांनी जयपूर येथील महारानी कॉलेजमधून एमए आणि बीएड केले. परंतु त्यांचं स्वप्न काहीतरी वेगळं होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

शिक्षक, पत्रकार आणि मग यूपीएससी परीक्षा

प्रीति यांनी सुरुवातीला पत्रकारितादेखील केली. त्यानंतर त्यांनी एम.फिल केले आणि शिक्षक म्हणून कार्यरत झाल्या. त्यांना आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली. त्यांना २५५ रँक मिळाली आणि त्यांची निवड आयपीएस पदी झाली.

आयपीएस प्रीति चंद्रा यांचे पती विकास पाठकदेखील आयपीएस अधिकारी आहेत. या दोघांची भेट लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमीत ट्रेनिंगनिमित्त झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं

SCROLL FOR NEXT