Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Success Story of IAS Sarjana Yadav: आयएएस सर्जना यादव या अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. दोनदा अपयश येऊनही त्यांनी जिद्द सोडली नाही.

Siddhi Hande

IAS सर्जना यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

तिसऱ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक

कोणत्याही कोचिंगशिवाय केला अभ्यास

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. देशासाठी काहीतरी करावं, असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. स्पर्धा परीक्षा ही खूप अवघड असते. यात अनेकांना अपयश मिळते. परंतु हे अपयश पचवणे हीच यशाची पहिली पायरी आहे.त्यामुळे कधीही हार मानू नका. नेहमी प्रयत्न करा. असंच कहीसं सर्जना यादव यांनी केलं आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

आयएएस सर्जना यादव यांनी तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाबी. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात १२६ रँक प्राप्त केली. सर्जना यांनी कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे.

IAS सर्जना यादव यांचे शिक्षण

सर्जना यादव यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केली. त्यांनी दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी TRAI मध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. दरम्यान, नोकरीसोबत अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये नोकरी सोडली आणि फुलटाईम अभ्यास केला. त्यांना २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्या आयएएस अधिकारी झाल्या.

सर्जना यादव यांच्या मते प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे अभ्यास करायला हवा. प्रत्येकाने अभ्यासासाठी वेळ काढायला हवा. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.आयएएस सर्जना यादव या सोशल मीडियावरदेखील खूप प्रसिद्ध आहे. त्या नेहमी तरुणांना प्रोत्साहन देत असतात.

प्रयत्न केल्यावर नक्कीच यश मिळते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. त्यामुळे अपयशामुळे कधीच खचून जायचं नाही. नेहमी आपले प्रयत्न सुरु ठेवायचे. तुम्ही जर मेहनत केली तर एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळणार. त्यामुळे नेहमी आपले प्रयत्न सुरु ठेवायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT