Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: सरकारची खास योजना! महिलांना मिळणार १०,००० रुपये; सुभद्रा योजना नक्की आहे तरी काय?

Subhadra Yojana For Women: ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना वर्षभरात १०,००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांना लाडकी बहीण योजना राबवली आहे. तर ओडिशा सरकारने सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जातात.

ओडिशा सरकारने खास महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना वर्षाला १०,००० रुपये दिले जातात. दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

या महिलांना मिळणार सुभद्रा योजनेचा लाभ (Subhadra Yojana Eligibility)

सुभद्रा योजनेचा लाभ २१ ते ६० वयोगटातील महिलांना मिळतो. महिला ही ओडिशा राज्याची रहिवासी असावी. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे.इन्कम टॅक्स देणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी https://subhadra.odisha.gov.in/index.html या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरायची आहे. यानंतर आधार कार्ड, बँक डिटेल्स ही सर्व माहिती भरावी लागणार आहे. यानंतर ई-केवायसी पूर्ण कावी लागणार आहे.

तुमचा फॉर्म व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे. यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल. यानंतर तुम्हाला सुभद्रा डेबिट कार्ड दिले जाईल. या योजनेत तुम्हाला वर्षाला दोन हप्त्यांमध्ये १०,००० रुपये दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत तुम्हाला वर्षभरात १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेसाठीही काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT