Alka Kubal: 'अत्याचार करणाऱ्या बापाला मुलीनेच संपवलं पाहिजे; महिला अत्याचारावर अलका कुबल यांचं मोठं विधान

Actress Alka Kubal: प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी खान्देश करिअर फेस्टिव्हलमध्ये महिलांवरील अत्याचारावर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले आहे.
Alka Kubal
Alka KubalSaam Tv
Published On

Actress Alka Kubal on physical abused: प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी खान्देश करिअर फेस्टिव्हलमध्ये महिलांवरील अत्याचारावर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले, अलका कुबल यावेळी म्हणाल्या, जर एक बापच आपल्या मुलीवर अत्याचार करत असेल, तर अशा बापाचा खून करायलाही मुलीने मागे पुढे बघू नयेत. त्यांच्या अशा विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कठोर कायद्यांची गरज अधोरेखित

अलका कुबल पुढे म्हणाल्या की, भारतात महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे लागू करावे लागतील. फक्त चर्चा न करता कारवाई झाली पाहिजे, त्यात जर एखादा बापच त्याच्या मुलीवर अत्याचार करत असेल तर अशा बापाला मुलीनेच संपवलं पाहिजे.

Alka Kubal
Bhool Chuk Maaf: 'आज 29 है या 30?'; टाईम लूपमध्ये अडकली राजकुमार राव आणि वामिका गब्बीची अजब लव्हस्टोरी

महिलांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका

त्यांनी महिलांनी स्वतःसाठी उभं राहण्याचं आवाहन करत सांगितलं की, जर घरातच सुरक्षितता नसेल, तर समाज कोणत्या आधारावर सुरक्षितता देईल? त्यांच्या या वक्तव्यामुळे महिला सशक्तीकरणावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे. त्यांच्या परखड मतांवर समाजात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक त्यांना धाडसी म्हणतायत, तर काहींनी या भाषेवर आक्षेप घेत संयमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Alka Kubal
Ankush Chaudhary: 'तोडी मिल फँटसी' सारखं नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा; म्हणाला,'आजवर अनेक भाषांमध्ये...'

अलका कुबल यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे 24 एप्रिलला वजनदार हे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अलका कुबल एका हिंदी वेब सीरिजमध्येही दिसणार आहेत. लवकरच त्या एक टेलिव्हिजन शो आणि मराठी चित्रपटांसाठीही अलका कुबल काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com