Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: या महिलांना दिले जातात १०,००० रुपये; सुभद्रा योजना नक्की आहे तरी काय?

Subhadra Yojana: ओडिशातील महिलांसाठी सरकारने सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दरवर्षी १०,००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेही अनेक योजना राबवल्या आहेत. ओडिशा सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी योजना राबवली आहे. ओडिशा सरकारने सुभद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जातात.

ओडिशा सरकारने सुभद्रा योजना महिलांसाठी राबवली आहे. महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांना सशक्त करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत कोणत्या महिलांना लाभ मिळतो आणि पात्रता काय हे जाणून घ्या.

या महिलांना मिळतो लाभ (These Women Will Get 5000 Rupees Under Subhadra Yojana)

सुभद्रा योजनेत फक्त ओडिशातील रहिवासी महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. २१ ते ६० वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत त्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या योजनेत लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स देत नसावा.

सुभद्रा योजनेत पैसे कधी मिळणार (Subhadra Yojana)

सुभद्रा योजना ही ५ वर्षांसाठी राबवण्यात ली आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी ५०,००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेत महिलांना दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये ५००० रुपये दिले जातात. दोनवेळा १०,००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा महिलांना होणार आहे.

या योजनेत महिलांना सुभद्रा डेबिट कार्ड दिले जाते. या डेबिट कार्डमधून ते पैसे काढू शकतात. या योजनेत आतापर्यंत महिलांना त्यांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. जवळपास १ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. लवकरच दुसरा जप्ता जमा केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT