
बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची योजना सुरू केलीय. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. (PM-JAY Ayushman Bharat Scheme Who Can Apply? Check Details)
सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षे आणि त्यावरील सर्व लोकांचा समावेश होतो. त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त तरीही त्याचा यात समावेश होत असतो. ज्या लोकांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु जे करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक आहेत, पीएफ किंवा ईएसआयसीची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या अधिकृत पोर्टल http://beneficiary.nha.gov.in/ ला भेट द्या.
आता 'मी पात्र आहे का' या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि त्यावर आलेला OTP पडताळून पहा.
यानंतर, तुमचे नाव, राज्य, जिल्हा इत्यादी माहिती भरा.
जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
हृदयरोग
हृदयरोग (सीएडी)
हार्ट अटॅक
कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर
उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत
अँजिओप्लास्टी
बायपास सर्जरी
कर्करोग ( कॅन्सर)
स्तन, गर्भाशय ग्रीवा, तोंड, पोट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा समावेश आहे.
न्यूरोलॉजिकल आजार
स्ट्रोक आणि अर्धांगवायू, मेंदूचा ट्यूमर, अपस्मारावरील उपचार, पाठीचा कणा आजार आणि पार्किन्सन यांचा समावेशदेखील होतो.
मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे आजार
जुनाट मूत्रपिंडाचा आजार (CKD), मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस आणि मूत्रमार्गाचे संसर्ग यांचा समावेश होत असतो.
यकृत (लिव्हर) आणि जठरांत्रांचे आजार
यकृत सिरोसिस, हिपॅटायटीस बी आणि सी, पित्ताशयाचे खडे, अॅपेंडिसाइटिस शस्त्रक्रिया आणि हर्नियासाठी उपचारदेखील दिले जातात.
श्वसनाचे रोग
दमा व्यवस्थापन, सीओपीडी, टीबी, न्यूमोनिया आणि इंटरस्टिशियल फुफ्फुस रोग (आयएलडी) साठी कव्हर केले जातात.
ऑर्थोपेडिक्स हाडांचे आजार
यात कंबर आणि गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर आणि हाडांच्या दुखापती, ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवाताचे उपचार यांचा समावेश होतो.
प्रसूती आणि स्त्रीरोग
वरील आजारांसह सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टॉमी यांचा समावेश यात होत असतो.
आगीत भाजणे, नवजात बालकांची काळजी, मानसिक आजार आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील या अंतर्गत समाविष्ट आहेत. याशिवाय, जन्मजात विकार, माता आणि बालरोग आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रिया देखील या कव्हरचा भाग आहेत. या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये निदान, औषधे आणि निवास व्यवस्था यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.