Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Maratha reservation protest in Mumbai: मराठा समाजाचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघालंय...मात्र उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्याच आंदोलनाची परवानगी दिलीय...मात्र न्यायालयाने काय म्हटलंय? पाहूयात 1 मिनिटात.
Maratha reservation protest in Mumbai
Bombay High Court permits Manoj Jarange’s Maratha protest at Azad Maidan for one day under conditions.saamtv
Published On
Summary
  • मनोज जरांगे यांनी दिलेल्या आंदोलनाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली.

  • मात्र ही परवानगी केवळ एका दिवसासाठीच आहे.

  • आझाद मैदानावर आंदोलन होणार असून अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत.

  • वाहतूक व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर न्यायालयाचा भर आहे.

सरकारची धडकी भरवणारं मराठा समाजाचं हे वादळ मुंबईच्या दिशेनं निघालंय..मात्र सरकार आंदोलनात आडकाठी आणत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. दरम्यान उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटीशर्तींसह परवानगी दिलीय... न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या आहेत? पाहूयात.

Maratha reservation protest in Mumbai
Manoj Jarange Patil: फडणवीसांना आईवरून शिवीगाळ, चित्रा वाघ यांच्या आरोपावर मनोज जरांगे संतापले

उच्च न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी दिलीय..सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच आंदोलन करता येणार आहे..विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे येत असताना आझाद मैदानावर केवळ मुख्य आंदोलकासह 5 हजार जणांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलीय..शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. यात परवानगीशिवाय स्पीकर वापरण्यासही बंधन घालण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com