
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठा राजकीय पाठिंबा मिळू लागलाय.
आमदार-खासदारांची रीघ आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लागली आहे.
‘चलो मुंबई’च्या हाकेनंतर समाजाचा दबाव नेत्यांवर वाढलाय.
आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला नवी चालना मिळाली आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे निघाल्यानंतर मराठा समाजाचा पाठिंबा वाढत चाललाय..अनेक गावांमधून तरुणाई जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झालेत.. त्यातच आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या आमदार-खासदारांना जरांगेंनी इशारा दिलाय. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आमदार-खासदारांवर मराठा समाजाचा दबाव वाढत आहे.. त्यामुळेच जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आमदार-खासदारांची रीघ लागलीय.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अंतरवाली सराटीत जाऊन थेट मनोज जरांगेंची भेट घेत आंदोलनाला पाठींबा दिलाय... एवढंच नाही तर क्षीरसागर मराठा बांधवांसोबत रॅलीत सहभागी झालेत. एवढंच नाही तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनीही जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा दिलाय..त्याबरोबरच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय. तर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आठवडाभरापुर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चलो मुंबईचा नारा दिलाय.. तर मतदारसंघात ठिकठिकाणी जरांगेंना पाठींबा देण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आलेत.
फक्त बीडच नाही तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही फेसबूक पोस्ट करत जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. तर ओमराजे निंबाळकरांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी केलीय. फक्त शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेनेच नाही तर काँग्रेसनेही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. कल्याण काळेंनी भरपावसात जरांगेंच्या आंदोलनात सहभाग घेतलाय. तर बाळासाहेब थोरातांनी जरांगेंच्या मागणीला पाठींबा दिलाय.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फक्त राजकीय क्षेत्रातूनच नाही तर गावखेड्यातून मोठा पाठींबा मिळतोय. राज्यभरातून मराठा समाज गाड्या भरुन मुंबईच्या दिशेने निघालाय.. त्यामुळे जरांगेंना वाढता पाठींबा आणि वाढत चाललेला मराठा समाजाचा दबाव यामुळे सरकारने आंदोलन थांबवण्यासाठी तोडगा काढणं गरजेचं आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.