Aastha Poonia Saam Tv
बिझनेस

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Sub Lieutenant Aastha Poonia Success Story: आस्था पुनिया यांनी नवीन विक्रम रचला आहे. भारतीय नौदलात त्या सब लेफ्टनंट म्हणून सहभागी झाल्या आहेत.

Siddhi Hande

अनेकांची देशसेवा करण्याची इच्छा असते. यासाठी भारतीय हवाई दल, आर्मीत तरुण भरती होत असतात. या क्षेत्रात काम करुन देशाच्या संरक्षणासाठी काम करतात. असंच स्वप्न आस्था पुनिया यांनीदेखील पाहिलं आणि पूर्णदेखील केले आहे. त्या आता हवाई दलात सब लेफ्टनंट आहेत. नौदलात सब लेफ्टनंट म्हणून सामिल होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही महिलेला नौदल लढाऊ विमाने उडवण्याची संधी मिळाली होती. (Who Is Aastha Poonia)

विंग्ज ऑफ गोल्ड पुरस्काराने सन्मानित (Wings of Gold)

विशाखापट्टणम येथे आयएनएस डेगा येथे झालेल्या समारंभात आस्था पुनिया यांना विंग्स ऑफ गोल्ड पुरस्काराने सन्मानित केला आहे. दुसरा बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स पूर्ण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नौदलात महिला वैमानिकांचे नवे पर्व (First Indian Women Pilot In Navy)

नौदलातील महिलांनी याआधी सागरी गुप्तर विमाने आणि हेलिकॉप्टर उडवले आहेत. तरीही लढाऊ विमान उडवण्यात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आस्था पुनिया यांनी हा नवीन विक्रम केला आहे. यामुळे महिला अधिकाऱ्यांना लढाऊ विमान उडवण्याचे दरवाजे उघडले आहेत.

आस्था यांचे वडिल अरुण पुनिया मेरठ हे शिक्षक आहेत. आस्था यांचे लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते. जेव्हा केव्हा आकाशातून विमान उडायचा आवाज यायचा तेव्हा आस्था यांना खूप उत्सुकता असायची, असं त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे. त्यावेळीच त्यांनी ठरवले होते की मीदेखील वैमानिक होणार.

आस्था यांनी एसडी इंटर कॉलेज मुजफ्फरनगरमधून इंटरमीडियएटचे शिक्षण केले. यानंतर वनस्थळी विद्यापीठ जयपूरमधून बीटेक केले. यानंतर त्यांची एसएसबीमध्ये टेक्निकल एन्ट्रीमधून निवड झाले. याचदरम्यान त्यांनी आयएनए एजीमाला केरळ येथून दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

Jio-Airtel Recharge Plans: वाह क्या बात! डेटा रिचार्जचे सहा भन्नाट प्लॅन्स; फक्त ५ रुपयांत मिळेल इंटरनेट डेटा

मनोज जरांगे पाटील चौथी पास झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा रॅपमधून हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT