Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल; दुसऱ्याच प्रयत्नात IAS, तपस्या परिहार यांचा प्रवास

Success Story Of IAS Tapsya Parihar: आयएएस तपस्या परिहार यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करणे खूप कठीण असते. अनेकजण दिवसरात्र मेहनत करुन ही परीक्षा क्रॅक करतात. असंच काहीसं तपस्या परिहार यांनी केलं. त्यांना यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आज त्या IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Success Story
Success Story: जिद्द! ९ तासांची नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS श्वेता भारती यांचा प्रेरणादायी प्रवास

तपस्या परिहार कोण आहेत? (Who Is IAS Tapsya Parihar)

तपस्या परिहार या मूळच्या मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील हे शेतकरी आहेत. तपस्या या लहानपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती होत्या. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण केंद्रीय विद्यालयातून केले. यानंतर १२वीनंतर त्या पुण्याला गेल्या. त्यांनी ILS लॉ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी लॉमध्ये ग्रॅज्युएशन पदवी प्राप्त केली.

तपस्या यांनी खूप अभ्यास केला. त्या पहिल्या प्रयत्नात यूपीएससी (UPSC) प्रिलियम्स परीक्षादेखील क्रॅक करु शकल्या नाहीत. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरीही त्या डगमल्या नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी अभ्यासाची योग्या स्ट्रॅटेजी बनवली. त्यांनी मॉक टेस्ट आणि करंट अफेयर्सवर जास्त लक्ष दिले. या काळात त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला नाही. त्यांच्या प्रयत्नाचे त्यांना यश मिळाले. त्यांनी २०२७ मध्ये ऑल इंडिया रँक २३ प्राप्त केली.

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय क्रॅक केली UPSC; दुसऱ्याच प्रयत्नात IAS; राधिका गुप्ता यांचा प्रवास

आयुष्यात कितीही वेळा अपयश आले तरीही आपण आपले प्रयत्न थांबवायचे नसतात. हे तपस्या यांनी दाखवून दिले.यूपीएससी परीक्षा ही तुमची परीक्षा घेत असते. त्यामुळे या परीक्षेत पास होणे हे तुमच्यासाठी खूप मोठे यश असेल. त्यामुळे कधीच हार मानू नका.

Success Story
Success Story: AI च्या मदतीने अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात IAS, विभोर भारद्वाज यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com