Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सरकारी शाळेतून शिक्षण; स्पर्धा परीक्षेत दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंकिता शर्मा यांचा प्रवास

Success Story Of IPS Ankita Sharma: आयपीएस अंकिता शर्मा यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या देशातील तडफदार आणि धाडसी आयपीएस अधिकारी आहेत.

Siddhi Hande

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. कितीही वेळा अपयश आले तरीही त्यावर मात करुन जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीसं आयपीएस अंकिता शर्मा यांच्यासोबत झालं. त्यांनाही आयुष्यात अपयश आले परंतु त्यांनी नेहमी आपले प्रयत्न सुरु ठेवले. आयपीएस अंकिता शर्मा यांचे नाव जरी घेतले तरीही अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्यांनाही पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळाले नव्हते. परंतु त्यांनी हार मानली नाही. (Success Story Of IPS Ankita Sharma)

IPS अंकिता शर्मा यांचा प्रवास

आयपीएस अंकिता शर्मा या देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्या खूप जास्त सुंदरदेखील आहे. त्या ब्युटी विथ ब्रेनचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेत २०३ रँक मिळवली.

अंकिता शर्मा यांचे प्रयत्न

अंकिता शर्मा या मूळच्या छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी. त्यांना यूपीएससी परीक्षेत दोनदा अपयश मिळाले. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी शेवटी ही स्पर्धा परीक्षा क्रॅक केली. त्या छत्तीसगड कॅडरच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी आहेत.

अंकिता यांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एमबीए केले. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते दिल्लीला गेले. यानंतर त्या आपल्या घरी छत्तीसगडला पोहचल्या.

यूपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात १५ गुणांनी त्यांना अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी प्रिलियम्सदेखील क्लिअर नव्हती केली. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी थेट २०३ रँक मिळवली.

आयपीएस अंकिता शर्मा यांचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात खूप आंदोलने केली. त्यांनी किरण बेदी यांना आपले प्रेरणास्थान मानले होते. (Inspirational Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT