Scholarship Saam Tv
बिझनेस

Student Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार १२००० रुपयांची स्कॉलरशिप; काय आहे योजना?

Scholarship For Students: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. या योजनेत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी १२,००० रुपयांची स्कॉलरिशिप दिली जाते.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती योजना

दरवर्षी मिळणार १२,००० रुपये

कोणाला मिळणार लाभ?

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांना उत्तम शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना १२००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

दुर्बल विद्यार्थ्यांसाठी खास योजना

दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजाारंची शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्र सरकारद्वारे ही शिष्यवृत्ती दिली जाते. आठवीच्या विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते.

केंद्र सरकारद्वारे घेतल्या या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेत ९० प्रश्न विचारले जातात. शैक्षणिक क्षमता चाचणीअंतर्गत विचाशक्ती आणि तर्क तपासणारे ९० प्रश्न विचारले जातात. यामध्ये गणित, समाजशास्त्र, विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले जातात.

या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न आणि वर्गातील गुण चेक केले जातात. आठवीनंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना चार वर्ष प्रत्येकी १२००० रुपये दिले जातात.

अटी

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ५५ टक्के गुण मिळवलेले असावे. याचसोबत विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश मंडळांची उद्या महाबैठक

Test Ranking : कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; खराब कामगिरीचा भारताच्या फलंदाजाला फटका, टॉप १० मध्ये कोण?

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT