Share Market Prediction Google
बिझनेस

Share Market Prediction : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मार्केटचा मूड कसा असेल? कोणता शेअर मालामाल करणार? वाचा

Share Market Prediction News : शेअर बाजार गुरुवारी बंद होतं. त्यानंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केट कसं राहणार, गुंतवणूकदारांना कोणता शेअर मालामाल करणार? वाचा

Vishal Gangurde

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनामुळे गुरुवारी शेअर बाजार बंद होतं. बुधवारी स्थानिक शेअर बाजाराला दोन दिवसांपासून सुरु घसरणीला ब्रेक लागला. अमेरिकी बाजारात तेजी आल्यानंतर आयटी कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली आहे. ३० शेअरवाला बीएसई सेन्सेक्स १४९.८५ अंकानी म्हणजे ०.१९ टक्क्यांनी घसरून ७९,१०५.८८ पातळीवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी किरकोळ ४.७५ अंकानी म्हणजे ०.०२ टक्क्यांनी घसरून २४,१४४.७५ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सच्या कंपनीमध्ये टाटा कंसल्टेंसी सर्व्हिस, एचसीएल, टेक्नोलॉजीज, टेक महिंद्रा, एन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सचे शेअर फायद्यात होते. तर अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

कोणते शेअर्स असणार तेजीत?

MACDच्या माहितीनुसार, EPL, Paytm, PolicyBazaar, SBFC Finance, ICICI Securities आणि युटीआय एमसीवर तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या शेअर्स इतर बदल देखील पाहायला मिळू शकतात.

MACDच्या अंदाजानुसार, Jindal Saw, HDFC Bank, Vedant Fashions,Clean Science and Tech, Deepak Fertilisers, Avanti Feeds या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळू शकते.

ग्लोबल मार्केटच्या अंदाजनुसार, बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी५० मध्ये शुक्रवारी पहिल्या सत्रात उसळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सकाळी ७.११ वाजता गिफ्ट निफ्टी प्यूचर्स १५९ अंकानी २४,३३३.५० पातळीवर होता. यामुळे व्यवहाराच्या पहिल्यात सत्रात तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वॉल स्ट्रीटच्या कामगिरीमुळे आशियाई बाजार देखील सक्रिय दिसत आहे. जपानचा निक्केई २.७६ टक्क्यांनी वधारला आहे. तर कोस्पी आणि एएसएक्स २०० म्हणजे १.७० टक्क्यांनी आघाडीवर आहे.

नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT