Share Market Today Saam Tv
बिझनेस

Stock Market Today : शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स?

Stock Market News in marathi : आज शेअर बाजार गडगडला. त्यामुळे सेन्सेक्स, निफ्टीत घसरण पाहायला मिळाली. या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

Vishal Gangurde

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशीही शेअर बाजार गडगडला. आज गुरुवारी सत्राच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. पीएसई, एफएमसीजीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

आज गुरुवारी शेअर बाजार सेन्सेक्स २१३ अंकांनी घसरला. तर निफ्टी २३६०० अंकावर स्थिरावला. आज शेअर बाजार विक्रमी निच्चांकी स्तरावर बंद झाला. शेअर बाजाराच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअरमध्येही मोठी विक्री झाल्याने रियल्टी, पीएसई, एफएमसीजीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. ऑटो, मेटल, तेल-गॅस इंडेक्समध्येही घसरणीसह बंद झाला. फार्मा, आयटी, बँकिंग, इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

आज शेअर बाजारात सर्वाधिक CIPLA चा शेअर २.४२ टक्क्यांनी उसळी घेऊन १,४७२ पातळीवर बंद झाला. तर अदानी पोर्ट्स SEZ १.७३ टक्क्यांनी वाढून १,१६४ पातळीवर बंद झाला. Infoysys शेअर ०.९९ टक्क्यांनी वाढून १,९१६ पातळीवर बंद झाला. Tata Consumer ०.८० टक्क्यांनी वाढून १,०२३ पातळीवर बंद झाला. या व्यतिरिक्त Dr. Reddys ०.७५ टक्क्यांनी उसळी घेऊन १,२३७ पातळीवर बंद झाला.

कोणते शेअर्स ठरले टॉप लूजर्स?

टाटा ग्रुप कंपनीचे Trentचे शेअर सर्वाधिक ८.२३ टक्क्यांनी घसरूण ५,२७७ वर बंद झाला. BEL चे शेअर ३.१९ टक्क्यांनी घसरून २७९.७५ रुपयांवर घसरून बंद झाला. Bharti Airtel चा शेअर २.४६ टक्यांनी कमकुवत होऊन १,६२० पातळीवर बंद झाला. Titan Company चा स्टॉक २.३० टक्क्यांनी घसरून ३,४११ वर बंद झाला. या व्यतिरिक्त NTPC चा शेअर २.१३ टक्क्यांनी घसरून ३१२.८० वर बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT