Stock Market Saam
बिझनेस

Share Market : शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला

Stock Market Today:आज शेअर बाजारात विक्रीचा बोलबाला राहिला. शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजारात विक्रीचा जोर अधिक होता. शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झालीय.

Bharat Jadhav

Stock Market Crashes Sensex Falls Over 1600 Points:

जागतिक मार्केटमध्ये मंदी असल्याने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरगुंडीने सुरू झाली. आज सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) आणि निफ्टी (NSE निफ्टी) मध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसलं. बाजार सुरू होताच सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला आणि ७२००० च्या खाली गेला. तर निफ्टी २१६५० च्या खाली गेला होता. यानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत.(Latest News)

आज शेअर बाजारात विक्रीचा जोर अधिक होता. शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये (Sensex-Nifty ) मोठी घसरण झालीय. दुपारी ३ वाजता सेन्सेक्स १,६१९,०५ अंकांनी (२.२१ %) घसरत आणि ७१,५०९.७२ च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टी ४६१.४५ अंक ( २.०९ टक्क्यांनी घसरत २१,५७०.८५ अंकांवर पोहोचला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यवहारच्या सुरुवातीला सेन्सेक्स १,३७१.२३ अंकांनी घसरून ७१,७५७.५४ अंकांवर आला. तर निफ्टी ३९५.३५ अंकांनी घसरत २१,६३६.९५ अंकांवर बंद झाला. सकाळी ९.१७ च्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी ०.९२ टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्स ७५५.२८ अंकांनी किंवा १.०३ टक्क्यांनी घसरत ७२,३७३, .४९ वर आणि निफ्टी २०३.५० अंकांनी घसरून २१,८२८.८० वर व्यवहार करताना दिसला.

आजच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात, भारती एअरटेल, इन्फोसिस, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, आयटीसी निफ्टी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली, तर एचडीएफसी बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटो यांना मोठा तोटा सहन करावा लागला. तिमाही निकालानंतर (Q3 परिणाम) आज HDFC बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

आज सुरुवातीच्या व्यवहारात देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून १,५८०.०० रुपयांवर आले. यासोबतच अॅक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्सही तोट्यात होते. या घसरणीमुळे, निफ्टी बँक सुरुवातीच्या व्यवहारात १,२०२.४ अंकांनी तोट्यासह व्यवहार करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT