Galaxy Unpacked Event :सॅमसंग Galaxy S24 सीरीज लाँच होणार; पॉवरफुल मोबाइलविषयी डिटेल्स जाणून घ्या

Galaxy Unpacked Event 2024: सॅमसंग ही स्मार्टफोनमध्ये नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने या वर्षातील पहिला Galaxy Unpacked इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहेत.
Galaxy Unpacked Event
Galaxy Unpacked EventSaam Tv

Galaxy Unpacked Event 2024 Galaxy S24 Series Will Be Launched:

सॅमसंग ही स्मार्टफोनमध्ये नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी नवनवीन फोन लाँच करत असते. कंपनी लवकरच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहेत. कंपनीने या वर्षातील पहिला Galaxy Unpacked इव्हेंट आयोजित केला आहे. हा इव्हेंट १७ जानेवारी म्हणजेच आज होणार आहे.

या कार्यक्रमात कंपनीचे अनेक फोन लाँच होणार आहेत. या इव्हेंटमध्ये कंपनी ३ नवीन फोन लाँच करु शकते. Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोन या इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकतात. कंपनीचे हे प्रीमियम डिव्हाइस असतील. ही कार्यक्रम ऑनलाइन लाइव्ह पाहू शकतात. याचसोबत कंपनी Galaxy AI चे अनावरण करेन. जो ब्रँडचा नवीन असिस्टंट असेल. (latest News)

Galaxy Unpacked 2024 इव्हेंट सॅन जोस, कॉलिफोर्निया येथील SAP सेंटरवर होणार आहे. हा कार्यक्रम अमेरिकन वेळेनुसार दुपार १ वाजता होणार आहे, भारतात हा इव्हेंट तुम्ही रात्री ११.३० वाजता पाहू शकता. कंपनीच्या युट्युब चॅनल, फेसबुक आणि एक्स या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा इव्हेंट लाईव्ह पाहू शकणार आहातं.

Galaxy S24

Galaxy S24 हा स्मार्टफोन या इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकेल. या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. यात 50MP प्राथमिक लेन्ससह कॅमेरा सेटअप मिळेल. या हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 264GB स्टोरेज मिळू शकते. या डिव्हाइसमध्ये 4000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Galaxy Unpacked Event
Petrol Price News: खुशखबर! फेब्रुवारीत पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

Galaxy S24 Plus

Galaxy S24 Plusमध्ये Galaxy S24 सारखाच कॅमेरा सेटअप मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. स्मार्टफोनमध्ये 4900mAh बॅटरी आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळू शकते.

Galaxy S24 Ultra

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये टायटॅनियम बॉडी वापरु शकतात. यात ब्रँडचा सर्वात पॉवरफुल कॅमेरा सेन्सर असेल. फोनमध्ये 6.8 इंचचा AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी मिळू शकते. ही नवीन स्मार्टफोन ७ वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेटसह लाँच होऊ शकतो.

Galaxy Unpacked Event
Whatsapp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर! आता अँड्रॉइडमध्ये करता येणार कस्टमाइज टेक्स्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com