Nuclear Battery: चार्जिंगच्या कटकटीपासून कायमची सुटका; एकदा चार्ज करुन ५० वर्ष चालणार बॅटरी

Nuclear Battery Developed China Company: खरं तर चार्जिंग करणं हे मोठं जिकरीचं काम. अनेकदा आपण चार्जिंग करणं विसरूनही जातो. यापासुन आता लवकरच सुटका मिळणार आहे. चिनच्या एका स्टार्टअप कंपनीने ५० वर्षे चार्ज न करता वापरता येणारी बॅटरी तयार केलीय. या बॅटरीबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या.
Nuclear Battery
Nuclear BatterySaam Tv
Published On

Nuclear Battery With 50 Year Life

चिनच्या एका स्टार्टअप कंपनीने ५० वर्षे चार्जिंग पुरेल, अशी बॅटरी (Nuclear Battery) तयार केलीय. ही बॅटरी कशी आहे? तिचा आकार कसा आहे, काम कसं करणार? हे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतील, आता याबाबत आपण व्यवस्थित जाणून घेवू या. (latest marathi news)

चीनच्या बीजिंग येथील Betavolt कंपनीने एक अशी बॅटरी तयार केली आहे, जी चार्ज न करता 50 वर्षे टिकणार आहे. ही एक आण्विक बॅटरी आहे. विशेष बाब म्हणजे या बॅटरीचा (Nuclear Battery) आकार नाण्यापेक्षाही लहान आहे. कंपनीने सांगितले की, ही बॅटरी अणुऊर्जेचे सूक्ष्मीकरण साकारणारी जगातील पहिली बॅटरी आहे. म्हणजे ही अणुशक्तीवरील सूक्ष्म बॅटरी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

AI च्या जगात क्रांती

कंपनीने सांगितलं की, या बॅटरीची (Nuclear Battery life) चाचणी पूर्ण झाली आहे. आगामी काळात ती स्मार्टफोन आणि ड्रोनसाठी ही बॅटरी वापरली जाईल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यापूर्वी कंपनीला सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त कराव्या लागतील. बीटाव्होल्टच्या अणुऊर्जा बॅटरी वैद्यकीय उपकरणे, एरोस्पेस, एआय उपकरणे, मायक्रोप्रोसेसर, प्रगत सेन्सर्स, लहान ड्रोन आणि मायक्रो रोबोट्सना दीर्घकालीन ऊर्जा देखील ही बॅटरी पुरवू शकतात. ही बॅटरी AI च्या जगात क्रांती घडवेल असा दावा कंपनीने केला आहे.

बॅटरीचे परिमाण

ही बॅटरी अणू समस्थानिक आणि डायमंड सेमीकंडक्टरच्या वेफर-पातळ थरांनी बनलेली आहे. सध्या ही बॅटरी (Battery)3 व्होल्टमध्ये 100 मायक्रोवॅट वीज निर्माण करते. 2025 पर्यंत ते 1 वॅट पॉवरवर आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या अणुऊर्जा बॅटरीची खास गोष्ट म्हणजे त्यातून निघणारे रेडिएशन मानवाला हानी पोहोचवत नाही, त्यामुळे ती वैद्यकीय क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Nuclear Battery
Acer Muvi 125: लूक आणि रेंज दोन्ही जबरदस्त! आली नवीन Swappable Battery इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ही बॅटरी कशी काम करते

ही बॅटरी आयसोटोपमधून निघणाऱ्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते. ही संकल्पना 20 व्या शतकात प्रथम विकसित झाली आहे. 2021-2025 च्या 14 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत चीन अणु बॅटरीचे सूक्ष्मीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहे. या बॅटरीमध्ये (Nuclear Battery) एक स्तरित डिझाइन आहे, ज्यामुळे बॅटरीला आग लागण्याचा किंवा फुटण्याचा धोका नाही. उणे 60 ते 120 अंश तापमानात देखील ही बॅटरी आरामात काम करू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

मानवी जीवनातील अनेक कामांसाठी त्याचा वापर करता येणार आहे. परंतु सुरूवातीला स्मार्टफोन आणि ड्रोन्समध्ये या बॅटरीचा वापर केला जाणार आहे. आता व्यवसायिक वापारासाठी या बॅटरीचं उत्पादन केलं जाणार आहे.

Nuclear Battery
Smartphone Battery: रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावणं ठरू शकतं धोकादायक; वाचा दुष्परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com