Stock Market Fell After Budget Saam Tv
बिझनेस

Stock Market : रेपो रेटची घोषणा होताच शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, 'हे' १० शेअर्स कोसळले

Stock Market update : रेपो रेटची घोषणा होताच शेअर बाजार धडाम झाला आहे. सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला आहे. शेअर बाजारात काही शेअर्स कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणूदरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर रेपो दराबाबत घोषणा केली. एकीकडे रेपो दराची घोषणा होताच शेअर बाजार धाडकन कोसळले आहे. गुरुवारी चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर रेपो दर 'जैसे थे' राहणार असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडला. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नवव्यांदा रेपो दरात बदल केले नाही. रेपो दराची घोषणा झाल्यानंतर सेन्सेक्स ५०० अंकांनी आपटला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५० अंकांनी घसरला.

आरबीआयने घोषणा करत सेन्सेक्स-निफ्टी गडगडला

आठड्याच्या चौथ्या दिवशी बीएसई सेन्सेक्सचा ७९,४२०.४९ अंकावर व्यवहार सुरु झाला होता. सकाळी १०.१० वाजताच्या सुमारास सेन्सेक्स ५०९.६९ अंकांनी म्हणजे ०.६४ टक्क्यांनी घसरून ७८,९५८.३२ वर आला. सेन्सेक्ससारखा एनएसई निफ्टी देखील घसरला. निफ्टीचा २४,१४९.४५ वर व्यवहार होत आहे.

कोणते शेअर्स कोसळले?

शेअर बाजार अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. लार्जकॅप कंपन्यामधील सामील असलेल्या Infy शेअर २.०१ टक्के, पॉवरग्रिड शेअर १.९० टक्के, एल अँड टी शेअर १.५० टक्क्यांनी घसरला. मिडकॅप कंपन्यांमध्ये सामील ABFRL शेअर २.९३ टक्के, पीइएल शेअर २.५८ टक्के, पॉलिसी बाजार २.५० टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप कंपन्यामध्ये सामील असलेला Fusion शेअर ८.७५ टक्के,SPLशेअर ६.७६ टक्के, omaxe शेअर ५ टक्के आणि लेमन ट्री शेअर ४.७० टक्क्यांनी घसरला.

बुधवारी शेअर बाजारात दिसली तेजी

शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स सकाळी ९.१५ वाजता ७९,५६५.४० वर सुरु झाला होता . दिवसभराच्या व्यवहारात १००० अंकांनी उसळी घेत ७९,६३९.२० वर पोहोचला होता. शेअर बाजार बंद बंद होता सेन्सेक्सची गती कमी होत गेली. मात्र, सेन्सेक्स ८७४.९४ अंकांनी म्हणजे १.११ टक्क्यांनी वधारून ७९,४६८.०१ वर बंद झाला.

दुसरीकडे एनएसई निफ्टीचा २४,२८९.४० वर व्यवहार सुरु होता. त्यानंतर रॉकेट गतीने २४,३३७.८ वर पोहोचला होता. निफ्टी-५० ३०४.९५ अंकांनी उसळी घेऊन २४,२९७.५० वर बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT