Spicejet Layoff Saam Tv
बिझनेस

Spicejet Layoff: स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट, 15 टक्के स्टाफ कमी करण्याचा कंपनीचा निर्णय

Spicejet Layoff 1400 Employees: स्पाइसजेट एअरलाइन कंपनी 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. मागील काही दिवसांपासून स्पाइसजेट आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

Spicejet Airline Company Layoff

महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम आता भारतातही होऊ लागला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान (Spicejet Airline Company) कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. (latest business news)

स्पाइसजेट अनेक महिन्यांपासून आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकली नाही. अनेकांना जानेवारी महिन्याचे पगार अजून मिळालेले नाहीत. भारताची बजेट एअरलाइन स्पाइसजेटने (Spicejet Layoff) हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या आहेत. स्पाइसजेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती मिळतेय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

15 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार

मिळालेल्या माहितीनुसार स्पाइसजेट (SpiceJet) 1400 कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. ही संख्या त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के आहे. सध्या कंपनीत एकूण नऊ हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. कंपनी सध्या 30 विमानं चालवत आहे. त्यापैकी 8 विमानं भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे. या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराचं बिल 60 कोटी रुपयांवर पोहोचले (Spicejet Layoff 1400 Employees) आहे. अशा परिस्थितीत कंपनी खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 1400 कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हा देखील खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

कर्मचाऱ्यांचे थकित वेतन

ईटीच्या म्हणण्यानुसार स्पाइसजेटच्या अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीकडून टाळेबंदीबाबत (Layoff) कॉल येणं सुरू झालं आहे. यापूर्वी स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना पगारात विलंब होत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार देण्यास कंपनीकडून सातत्याने विलंब होत होता. अनेक कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेलं नाही. कंपनी काही गुंतवणूकदारांकडून 2,200 कोटी रुपयांचं भांडवल भरण्याच्या प्रक्रियेत आहे.

अनेक दिवसांपासून जगभरात नोकऱ्यांवर संकटाचे ढग आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आज ट्रेडिंग सत्रात स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला (Airline Company Layoff) मिळाली. स्पाइसजेट एअरलाईनने 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT