Shruti Vilas Kadam
कोरडी, तेलकट, संवेदनशील किंवा नॉर्मल त्वचा यानुसार बॉडी लोशन वेगवेगळे असतात. कोरड्या त्वचेसाठी जाड आणि मॉइश्चरायझिंग लोशन तर तेलकट त्वचेसाठी हलकं, नॉन-ग्रीसी लोशन योग्य ठरतं.
लोशनमध्ये अॅलोवेरा, शिया बटर, ग्लिसरीन, व्हिटॅमिन E यांसारखे नैसर्गिक घटक असतील तर ते त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. पॅराबेन्स आणि हार्श केमिकल्स असलेली लोशन टाळावीत.
त्वचा खाज सुटणारी, रॅशेस येणारी किंवा खूप कोरडी असेल तर मेडिकेटेड किंवा डर्माटोलॉजिस्ट-रिकमेंडेड लोशन निवडणं चांगलं.
खूप तीव्र सुगंध असलेली बॉडी लोशन संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात. शक्यतो माइल्ड किंवा फ्रॅग्रन्स-फ्री लोशन वापरा.
हिवाळ्यात जाड आणि जास्त मॉइश्चर देणारं लोशन उपयोगी ठरतं, तर उन्हाळ्यात हलकं आणि पटकन शोषलं जाणारं लोशन निवडावं.
दिवसभर बाहेर फिरायचं असेल तर SPF असलेलं बॉडी लोशन त्वचेला सूर्यकिरणांपासून संरक्षण देतं आणि टॅनिंग टाळायला मदत करतं.
नवीन बॉडी लोशन वापरण्याआधी हाताच्या आतल्या बाजूवर लावून पॅच टेस्ट करा. यामुळे अॅलर्जी किंवा इतर दुष्परिणाम टाळता येतात.