Skoda Superb relaunched in India Saam Tv
बिझनेस

Skoda Superb: सेफ्टीत बेस्ट अन् स्टाईलमध्ये ग्रेट, भारतीय बाजारात पुन्हा घेतली 'या' कारने एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Skoda Superb relaunched in India: प्रसिद्ध वाहन उत्पदक कंपनी Skoda ने अखेर आपली लक्झरी सेडान Superb भारतीय बाजारपेठेत पुन्हा लॉन्च केली आहे.

Satish Kengar

Skoda Superb relaunched in India:

प्रसिद्ध वाहन उत्पदक कंपनी Skoda ने अखेर आपली लक्झरी सेडान Superb भारतीय बाजारपेठेत पुन्हा लॉन्च केली आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 54 लाख रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने ही सेडान कार सिंगल पॉवरट्रेनसह फुली लोडेड व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे.

ग्राहक त्यांच्या जवळच्या स्कोडा अधिकृत शोरूमला भेट देऊन किंवा ब्रँडच्या ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन ही कार बुक करू शकतात. कंपनी या महिन्याच्या अखेरीस याची डिलिव्हरी देखील सुरू करेल.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या सेडानमध्ये क्रोम सराउंडसह सिग्नेचर स्कोडा रेडिएटर ग्रिल, फ्रंट बंपरवर लोअर एअर डॅम, एलईडी हेडलॅम्प, कॉर्नरिंग फंक्शनसह एलईडी फॉग लॅम्प, क्रिस्टल एलिमेंटसह एलईडी टेललॅम्प आणि मागील फॉग लाइट्स आहेत. यात नवीन डिझाइन केलेले 18-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स देखील मिळतात. कंपनीने मॉडेलच्या सिल्हूटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  (Latest Marathi News)

इंजिन

Skoda Superb च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2.0-लिटर, चार-सिलेंडर, TSI गॅसोलीन मोटर देण्यात आली आहे . जी 187bhp पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सध्या याच्या मायलेजबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

फीचर्सबद्दल बोलायचे तर, यात मोबाईल कनेक्टिव्हिटीसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्रायव्हर सीटसाठी मसाज फंक्शन, लेदर रॅप्ड गियर नॉब आणि थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल आहे. याव्यतिरिक्त यात व्हर्च्युअल कॉकपिट, 12-स्पीकर कँटन ऑडिओ सिस्टम आणि मागील विंडो आणि विंडस्क्रीनसाठी रोल-अप सन व्हिझर्स मिळतात.

जबरदस्त आहेत सेफ्टी फीचर्स

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं तर, यात ABS, हिल ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, ॲक्टिव्ह TPMS, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, पार्क असिस्ट आणि 9 एअरबॅग देण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे सेडानला याआधी NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT