Gold- Silver Price Saam Tv
बिझनेस

Silver Price Today : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, सराफा बाजार उघडताच ₹९००० नी महागले, ३.२ लाखांवर दर जाण्याची शक्यता

Silver price today in India jumps by ₹9,000 : सराफा बाजार उघडताच चांदीच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी २.५२ लाखांवर पोहोचली.

Namdeo Kumbhar

Gold-Silver Rate Today In India : फक्त सोन्याच्या किंमतीच वाढत नाही तर मागील काही दिवसांपासून चांदीच्या दरानेही उच्चांक गाठलाय. आज सराफा बाजार उघडताच चांदी तब्बल ९ हजार रूपयांनी वाढलेय. गेल्या काही दिवसांपासून जगातील तणावग्रस्त स्थिती आणि व्यापारातील अश्चिततेमुळे सोनं आणि चांदीचे दर वाढत असल्याचा अंदाज एक्सपर्टकडून वर्तवण्यात आलाय. २०२६ ची सुरूवात झाल्यापासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळे ग्राहक आणि नागरिक हैराण आहेत. दरम्यान, वर्षभरात चांदीची किंमत एक लाखांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

MCX वर सोनं अन् चांदीच्या दरात वाढ

१२ जानेवारी, गुरूवारी सरफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात प्रतितोळा १६०० रूपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरांमध्येही रेकॉर्डब्रेक वाढ नोंदवण्यात आली. भविष्यात चांदीच्या किंमती प्रति किलो ३ लाखांचा टप्पाही पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज सोन्याचा भाव किती आहे? (Gold Price Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास सोन्याची किंमत ९६१ रुपयांनी वाढून १,३८,७०३ रुपये प्रति तोळा झाली. आज सोन्याच्या किमतीत अंदाजे ०.७ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका बसलाय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा १६०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

आजचे चांदीचे दर काय? (Silver Price Today)

सोन्याच्या किंमतीप्रमाणेच चांदीच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचे दर ३.७१ टक्क्यांनी वाढले आहेत. सकाळी चांदीच्या किमती ९,०३८ रुपयांनी वाढून २,५२,३६२ रुपये प्रति किलोवर ​​पोहोचली. दरम्यान, एक्सपर्टच्या मते, ही दरवाढ फक्त सुरूवात आहे, भविष्यात चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. सध्या बाजारात चांदीची मागणी जास्त आहे आणि पुरवठ्याअभावी किमती सातत्याने वाढत आहेत.

चांदीची किंमत ३ लाखांच्या पुढे जाणार

यंदाच्या वर्षात चांदीचे दर प्रति किलो ३ लाख २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज मोलीलाल ओसवाल यांच्य ताज्या रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आलाय. म्हणजेच, यंदा चांदीच्या दरात तब्बल २७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये चांदीने तब्बल १७० टक्के रिटर्न दिले होते.

चांदीचा वापर आता फक्त दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने (EV), पॉवर ग्रिड आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे मागणी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त आहे, त्यामुळे चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी PMPML च्या १०५६ बसेस धावणार

गद्दार...महिलांनी हातात चपला घेतल्या; उपनगराध्यक्षपदावरून अंबरनाथमध्ये राडा, VIDEO

Beetroot Raita Recipe : पौष्टिक आणि चविष्ट बीटरुट रायता कसा बनवावा? लगेचच नोट करा रेसिपी

भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

SCROLL FOR NEXT