Goyal Salt Share Saam Tv
बिझनेस

Goyal Salt Share: मीठ बनवणाऱ्या कंपनीची कमाल! 38 रुपयांचा शेअर अवघ्या अडीच महिन्यांत 150 रुपयांच्या पार

Share Market: मीठ बनवणाऱ्या एका लहान कंपनीने अवघ्या अडीच महिन्यातच शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग होताच त्याचे गुतंवणूकदार मालामाल झाले.

Satish Kengar

Goyal Salt Share:

मीठ बनवणाऱ्या एका लहान कंपनीने अवघ्या अडीच महिन्यातच शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग होताच त्याचे गुतंवणूकदार मालामाल झाले. आता याच्या शेअर्सने चांगलीच गती पकडली आहे. आपण ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत ती आहे गोयल सॉल्ट लिमिटेड (Goyal Salt Ltd). या कंपनीचा मीठ बनवण्याचा व्यवसाय आहे.

गोयल सॉल्ट लिमिटेड या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. या आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गोयल सॉल्टचे शेअर्स एनएसई एसएमईवर वर 130 रुपये प्रति शेअर या दराने लिस्ट झाले. तर आयपीओची किंमत प्रति शेअर 38 रुपये होती. आयपीओ बँडनुसार, या कंपनीचे शेअर्स 242 टक्क्यांच्या प्रीमियमने बाजारात आले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लिस्टिंग झाल्यानंतरही गोयल सॉल्ट लिमिटेडचे ​​शेअर्स वेगाने वाढत आहेत. एनएसईवर या शेअरची किंमत सध्या 153 रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 189 रुपये आहे. जो 25 ऑक्टोबर 2023 रोजी लागू करण्यात आला होता आणि 52 आठवड्यांचा नीचांक 123 रुपये आहे. लिस्टिंग झाल्यानंतरही या शेअरने अडीच महिन्यांत 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या आयपीओमध्ये (IPO) किरकोळ गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी 114,000 रुपये गुंतवावे लागले. जे लिस्टिंगच्या दिवशीच 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले होते. म्हणजेच या आयपीओने गुंतवणूकदारांना तिप्पट नफा मिळवून दिला होता. गोयल सॉल्टचा आयपीओ एकूण 294.61 वेळा सबस्क्राइब झाला आहे. या आयपीओचा आकार फक्त 18.63 कोटी रुपये होता. या इश्यूद्वारे कंपनीने नवीन 49.02 लाख शेअर जारी केले होते.

कंपनीची माहिती

दरम्यान, ही राजस्थानस्थित कंपनी कच्चे मीठ तयार करते. कंपनी साबण, डिटर्जंट उद्योग, रासायनिक उद्योग, कापड आणि डाईंग उद्योगांसाठी मीठ उत्पादन आणि पुरवठा करते. तसेच गोयल सॉल्ट कंपनी काच, प्लास्टिक, रबर, पॉलिस्टर आणि चामड्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना मीठाचा पुरवठा करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT