Share Market Latest News in Marathi  Saam TV
बिझनेस

Share Market : शेअर बाजारात जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची झाली चांदी, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर? वाचा

Share Market update : आज मंगळवारी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शेअर बाजारात मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारातील व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

बाजार बंद होण्यापूर्वी शेअर बाजारात सेन्सेक्सच्या ३० शेअरमध्ये ५९७ अंकानी उसळी पाहायला मिळाली. बाजार बंद झाल्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये १६८ अंकांनी उसळी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात गौतम अदानी यांचं अदानी पोर्टच्या शेअरने मोठी उसळी घेतली. तर मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी बीएसई सेन्सेक्समध्ये मागील दिवशी सेन्सेक्स ८०,२४८ वर बंद झाला. तर त्यानंतर आज ८०,५२९.२० वर सुरु झाला. त्यानंतर व्यवहारात इंडेक्सची तेजी वाढत गेली. शेअर बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्सने ६५० अंकांनी उसळी घेतली होती. मात्र, शेवटी ५९७.६७ अंकांनी उसळी घेऊन ८०,८४५.७५ वर बंद झाला.

निफ्टीनेही सेन्सेक्ससारखी उसळी घेतली. यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंद पाहायला मिळाला. निफ्टी मागील सोमवारी २४,२७६.०५ वर बंद झाला होता. त्यानंतर आज निफ्टीमध्ये २४, ३६७.५० अंकांनी वाढ पाहायला मिळाली. या निफ्टीमध्ये १६० अंकांनी तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद होईपर्यंत इंडेक्स १८१.१० अंकानी वाढ दिसून आली.

अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये झाली ६ टक्क्यांनी वाढ

शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला लार्ज कंपन्यांमध्ये सामील असणारे उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स शेअर्सने तेजीत सुरुवात केली. त्यानंतर दिवसभर या शेअर्सने ६.३६ टक्क्यांनी उसळी घेतली. या शेअरचा भाव १३०० रुपये पार गेला. काही वेळानंतर अदानी स्टॉक ६.०२ टक्क्यांनी वाढून १२८८.८० रुपयांनी बंद झाला.

कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?

NTPC Share (2.60 टक्के),

Axis Bank Share (2.18 टक्के)

SBI Share (2.12 टक्के)

LT Share (2.12 टक्के)

UltraTech Cement Share (1.65 टक्के)

Tata Motors Share (1.42 टक्के)

HDFC Bank Share (1.24 टक्के)

RIL Stock ( 1.10 टक्के)

HCL Tech (1.00 टक्के)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT