Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर; पडझडीनंतर घेतली उसळी, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?

Share Market update : आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिवसभराच्या पहिल्या सत्रात घसरण दिसून आली. त्यानंतर शेअर बाजार बंद झाल्यानतंर दोन्ही इंडेक्स ग्रीनझोनमध्ये दिसले.
Share Market Today
Share Market TodaySaam Tv
Published On

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बाजारात व्यवहाराच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. मात्र, शेअर बाजार बंद होईपर्यंत बॉम्बे स्टॉक एस्सचेंजच्या ३० शेअरच्या सेन्सेक्समध्ये अचानक ४४५ अंकांनी उसळी दिसून आली.

शेअर बाजारात आज सोमवारी सेन्सेक्स ८०,००० पार गेला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १४२ अंकांनी उसळी घेऊन २४,२७४ अंकावर स्थिरावला. शेअर बाजारात अचानक तेजी आल्याने काही शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. यामध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री ते गौतम अदानी यांची अदानी पोर्ट्सच्या कंपनीच्या स्टॉक्सचा समावेश आहे.

Share Market Today
Business Idea: पैशांसाठी सरकारी मदत घेऊन तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिना होईल तगडी कमाई

शेअर बाजारात मागील शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ७९,८०२.७९ पातळीवर स्थरावर होता. त्यानंतर सोमवारी ७९,७४३.८७ अंशापासून सेन्सेक्सच्या व्यवहाराला सुरुवात झाली. त्यानंतर काही मिनिटात सेन्सेक्स ४८४.३० अंकांनी घसरला. पुढे ७९,३१८.४९ पातळीवर स्थिरावताना दिसला. एनएसई निफ्टी मागील शुक्रवारी २४,१३१.१० अंशावर बंद झाला होता. त्यानंतर आज सोमवारी निफ्टीचा २४,१४० अंकावरून व्यवहार सुरु झाला. पुढे निफ्टी १२०.७५ अंकांनी घसरून २४,०१०.३५ अंकावर स्थिरावला.

Share Market Today
घरबसल्या कमवा लाखो रुपये; वाचा 5 भन्नाट Business Ideas

शेअर बाजारात काही तासांनी अचानक पडझड थांबली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये दिसले. शेअर बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स ४४५.२९ अंकांनी उसळी घेऊन ८०,२४८.०८ वर बंद झाला. तर निफ्टी १४२.९० अंकांनी उसळी घेऊन २४,२७४ अंकावर स्थिरावला.

कोणत्या १० शेअर्समध्ये दिसली तेजी?

शेअर बाजारात सेन्सेक्सने उसळी घेतल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट शेअर ३.९३ टक्क्यांनी उसळी घेऊन ११,६३९.६५ रुपयांवर बंद झाला. जेएसडब्लू स्टील शेअर २.४७ टक्क्यांनी उसळी घेऊन ९९०.०५ रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्स शेअरने २.१८ टक्क्यांनी उसळी घेऊन १२१५.६० रुपयांवर बंद झाला. रिलायन्स शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. या शेअर्सने १.२८ टक्क्यांनी उसळी घेतल्यानंतर १३०९.०५ रुपयांवर बंद झाला होता.

Share Market Today
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

टेक महिंद्रा (१.८१ टक्के), टायटन शेअर (१.७३ टक्के), मारुती सुझुकी (१.६० टक्के), एम अँड एम शेअर (१.५९ टक्के), सनफार्मा शेअर (१.४९ टक्के) आणि टाटा स्टील शेअर (१.२८ टक्के) हे शेअर उसळीसह बंद झाले. तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप कॅटगरीच्या काही कंपन्यामध्येही तेजी पाहायाला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com