Share Market Today Saam Digital
बिझनेस

Share Market Today : शेअर बाजारात अचानक उसळी; सेन्सेक्स, निफ्टीने तोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड

Share Market : शेअऱ मार्केटमध्ये अचानक उसळी घेतली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्सचा सेंसेक्स १५०० अंकांनी वाढून तब्बल ८३००० अंकांच्या पलीकडे पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीने आजपर्यंतचे सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत.

Sandeep Gawade

गुरुवारी, १२ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय शेयर बाजारात अचानकच तूफानी तेजीची लाट पहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा सेंसेक्स १५०० अंकांनी वाढून ८३००० च्या पलीकडे पोहोचला. तर नेशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने ५०० अंकांची उसळी घेत २५,४२९ च्या नवीन ऑल टाइम उच्चांक गाठला आहे.

ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे गुरुवारी सकाळी शेयर बाजाराची धमाकेदार सुरुवात झाली. सेंसेक्स ४०० अंकांनी वाढून सुरू झाला, तर निफ्टीनेही १०० अंकांपेक्षा अधिक वाढ दर्शवली. दुपारी ३ वाजून १० मिनिटे झाल्यानंतर, म्हणजेच मार्केट बंद होण्याच्या २० मिनिटे आधीच, सेंसेक्स आणि निफ्टीत झालेल्या अचानक उंचीमुळे सर्व पूर्वीचे रेकॉर्ड तुटले. यामुळे बाजाराने एक नवीन इतिहास निर्माण केला. सेंसेक्सने पहिल्यांदाच ८३,००० चा आकडा पार केला, तर निफ्टी २५,४०० च्या पलीकडे गेला.

या अचानक वाढीमुळे काही शेअर्सने विशेषत: लक्ष वेधून घेतले. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ४.३८ टक्के वाढ झाली आणि ते १६४७ रुपये पर्यंत पोहोचले. हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये ४.३७ टक्के वाढ झाली आणि ते ६७६ रुपयांपर्यंत पोहोचले. एनएमडीसी, एलआयसी हाऊसिंग, आणि मॅक्स हेल्थ यांच्या शेअर्समध्येही ४ टक्क्यापेपेक्षा अधिक वाढ झाली.

शेअर बाजार बंद होण्याआधी आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचा मार्केट कॅपिटलायझेशन ६.६ लाख कोटी रुपयांनी वाढून ४६७.३६ लाख कोटी रुपये झाला आहे. या अभूतपूर्व वाढीमुळे भारतीय शेयर बाजारात एक इतिहास रचलो गेला आहे.

गेल्या व्यापारी दिवशी, बुधवारी, शेअर बाजारातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, मेटल, ऑटोपासून PSU स्टॉक्सपर्यंत, विक्रीचा दबाव दिसून आला आणि Sensex-Nifty कोसळले होते. पण आज ही परिस्थिती बदललेली दिसली आणि याचे संकेत बाजार उघडण्यापूर्वीच मिळू लागले होते. वास्तविक, यूएस बाजारात सुरुवातीला दबाव होता, पण अचानक तेजी येऊन दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. त्यानंतर आशियाई बाजारांमध्येही वाढ दिसून आली. Gift Nifty मध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: आजच हे काम करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००; वाचा नवी अपडेट

Venus And Sun Yuti: जानेवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना होणार धनलाभ

Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

Tilachi Vadi Recipe : मकर संक्रांतीला खास बनवा तिळाच्या वड्या, वाचा इंस्टंट रेसिपी

Municipal Election : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करतेय, तर वडील चौकीदारी, भाजपनं पोराला दिली उमेदवारी

SCROLL FOR NEXT