Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market : शेअर बाजारावर 'ट्रम्प इफेक्ट'; सेन्सेक्सची उसळी, ५ शेअरची रॉकेट झेप

share market today in marathi : आज शेअर बाजारात 'ट्रम्प इफेक्ट' पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात सेन्सेक्सने उसळी घेतली. ५ शेअरने रॉकेट झेप घेतली.

Vishal Gangurde

stock market today : शेअर बाजारात काल पडझड पाहायला मिळाली. त्यानंतर आज मंगळवारी शेअर बाजार सावरला. सेबीएसई सेन्सेक्स १,३९७ अंकांनी उसळी घेत ७८,५८३.८१ पातळीवर पोहोचला. त्यानंतर निफ्टी १.५ टक्क्यांनी उसळी घेत २३००० वर पोहोचला. तर आज ५ शेअरने रॉकेट झेप घेतली.

शेअर बाजारात टाटा मोटर्स, लॉर्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि एसबीआयच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. काही इतर शेअरमध्येही हिरवळ पाहायला मिळाली. एफएमसीजीचे शेअर सोडले तर इतर क्षेत्रातील इंडेक्समध्येही हिरवळ पाहायला मिळाली.

ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या निर्णयाने दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅक्सिको आणि कॅनडावरील आयात वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णयाला स्थगिती दिली. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली आहे. याआधी व्हाइट हाऊसने कॅनडा आणि मॅक्सिकोतून आयात करणाऱ्या अतिरिक्त २५ टक्के आणि चीनवरील वस्तूंवर १० टक्के ड्यूटी लावण्याचाही निर्णय घेतला होता. यामुळे जागतिक युद्धाचं सावट निर्माण झालं होतं. मात्र, नव्या निर्णयाने बाजारातील वातावरण बदललं आहे.

भारतीय उत्पादन क्षेत्रात उसळी पाहायला मिळत आहे. एचएसबीसी इंडिया उत्पादन क्षेत्रातील पीएमआय इंडेक्स जानेवारीत ५७.७ वर पोहोचला आहे. याआधी मागच्या वर्षी डिसेंबरमध्येही ५६.४ टक्के होता. या व्यतिरिक्त जीएसटी कलेक्शन देखील जानेवारी महिन्यात १.९२ लाख कोटींसोबत ९ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर होता.

रुपयांमध्ये सुधारणा

रुपयांच्या रेकॉर्डच्या निच्चांकी स्तरावर १३ पैशांनी मजबूत होऊन ८६.९८ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करत आहे. ट्रम्प यांनी टॅरिफवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अमेरिकेचा डॉलर इंडेक्स १०९.८८ ने घसरून १०८.७४ वर पोहोचला. यामुळे रुपया मजबूत झाला आहे.

आशियाई बाजारात तेजी

ग्लोबल मार्केटमध्ये तेजी असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सपोर्ट मिळाला. आशियाई शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. जपानचा निक्कई २२५, हॉककाँगचा हँग सँग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्समध्ये १-२ टक्के तेजी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT