Share Market Saam Tv
बिझनेस

Share Market Opening: शेअर बाजार उघडताच आपटला, सेन्सेक्स घसरला; पण ४ शेअर लय सुस्साट, आताच बघा लिस्ट!

Share Market Opening Today: आज शेअर मार्केटची सुरुवात फार काही चांगली झाली नाही.शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.

Siddhi Hande

Stock Market Today: रोज सकाळी गुंतवणूकदारांचे लक्ष शेअर मार्केटकडे असते. काल म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला इक्विटी इंडेक्स वाढीसह बंद झाले होते. त्यानंतर आजही शेअर मार्केटमध्ये काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी सेन्सेक्स ८२.६५२.६९ अंकासह उघडला.

सकाळी ९.३० वाजता सेनसेक्स ८२,६७५.०६ वर पोहचला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी २५,३१३.४० वर उघडला.आज शेअर मार्केट काही प्रमाणात तेजीत दिसत आहे.

आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी? (Top Shares)

सनफार्मा, एशियन पेंट्स, टिसीएस, टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअर्समध्ये चेजी पाहायला मिळाली आहे. तर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. FMCG आणि Pharma कंपन्यांमध्ये आज तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या टॉप शेअर्सवर राहिल गुंतवणूकदारांचे लक्ष (Share Market)

बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, हिरो मोटो कॉर्प, एसबीआय लाइफ, व्होल्टास, हिंल्दाल्को, कमिन्स इंडिया, पीआय इंडस्ट्रीज, इंडियन हॉटेल या कंपनीच्या शेअर्समध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे. काल या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती.

काल शेअर मार्केटमध्ये निफ्टी २५,२५० अंकावर बंद झाला. काल आयटी, एफएमसीजी, बँकिंग शेअर्स सर्वात जास्त तेजीत होते. ट्रेंडिग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स १९४.०७ अंकासह म्हणजे ०.२४ टक्क्यांच्या वाढीसह ८२,५५९.८४ वर बंद झाला. तर निफ्टी ४२.८० अंकांनी म्हणजे ०.१७ टक्के वाढले आहे. निफ्टी २५,२७८.७० वर बंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT