Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market : अमेरिकेच्या कनेक्शनमुळे शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स ११९० अंकांनी आपटला, कोणत्या शेअरने केली गुंतवणूकदारांची चांदी?

Share Market Todyay : अमेरिकेच्या कनेक्शनमुळे शेअर बाजारात हाहाकार झाला आहे. आजही शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शेअर बाजारात चढ-उतार सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळी शेअर बाजारात मोठी तेजी होती. मात्र, आज दुपारनंतर आयटीच्या शेअरची विक्री सुरु झाली आहे. त्यानंतर शेअर बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये बंद झाले.

शेअर बाजारात अचानक आलेल्या पडझडीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचा व्याज दर कमी खेल्याने आयटीच्या शेअरची विक्री सुरु झाली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी २४ हजार अंकांहून खाली पोहोचला.

सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी इतक्या शेअरमध्ये घसरण?

सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी २९ शेअर हे बाजार बंद झाल्यावर रेड झोनमध्ये बंद झाले. ३० शेअरपैकी एकच शेअर ग्रीन झोनमध्ये दिसला. एसबीआय शेअर ग्रीन झोनमध्ये दिसला. या शेअरमध्ये ०.५९ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.

निफ्टी ५० च्या किती शेअरमध्ये झाली घसरण?

निफ्टी ५० शेअरच्या तक्त्यात ४ कंपन्यांचे शेअर सोडून ४६ कंपन्यांचे शेअर रेड झोनमध्ये दिसले. निफ्टी ५० मध्ये काही शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. या कंपनीमध्ये ADANIENT, CIPLA, SHRIRAMFIN आणि SBIN या कंपन्यांचा समावेश आहे.

बीएसईच्या यादीतील कंपन्यांचं मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. मार्केट कॅप १.५२ लाख कोटींनी घसरून ४४२.९६ लाख कोटींपर्यंत पोहोचली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचा व्याज दर कमी केल्याने शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. यामुळे आयटीच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी आयटी इंडेक्स २.३ टक्क्यांनी घसरला. एलटीटीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यामुळे घसरण दिसून आली.

दुसरीकडे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ९.३ टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली. अदानी समूहाने अमेरिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळत आहे.

अदानी एनर्जी सॉल्यूशन्स आणि अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाळी. या दोन्ही शेअरमध्ये अनुक्रमे ९ टक्के आणि ९.३ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये ८.३ टक्क्यांनी उसळी दिसून आली. यामुळे ग्रीन एनर्जीचा शेअर १,०७२ रुपयांपर्यंत पोहोचला. अदानी पॉवर, अदानी एंटरप्राइजेज, अदानी विल्मर आणि अदानी पोर्ट्सच्या शेअरमद्ये ५ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. प्रॉसिक्यूटरनंतर मंगळवारी ३४ बिलियन डॉलरचं नुकसान झाल्यानंतर समूहाच्या शेअरमध्ये बुधवारी जवळपास १४ बिलियन डॉलरची वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT