आज सकाळी शेअर मार्केट उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये आज सकाळी सेन्सेक्स १३७४ अंकांनी घसरुन ७८३४९ वर आला आहे. तसेच निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये ४४५ अंकांनी मोठी घसरण झाली आहे. निफ्टी २४००० वरुन २३८५९ वर व्यव्हार करत आहे. (Share Market Today 4th November)
सकाळी शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स ०.९५ टक्क्यांनी घसरुन ७८,९६५ च्या पातळीवर व्यव्हार करत होता. तर NSE निफ्टी २४,०७३ वर व्यव्हार करत होता. त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल होताना दिसत आहे.
सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी फक्त ५ शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. तर उरलेल्या २५ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. फक्त M&M,Tech Mahindra,HCL,HUL,Indusland Bank चे शेअर्स वाढताना दिसत आहे.
आज शेअर मार्केटमध्ये सनफार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. जवळपास ४ टक्क्यांनी शेअर्स घसरले आहेत. तर MCX च्या शेअर्समध्येही ४ टक्क्यांनी घसरण होत आहे. (Share Market Sensex And Nifty Drops)
आज आशियाई शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येत आहे. आज GIFT NIFTY 0.02 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Nikkie 225 आज बंद आहे. आज आशियाई शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे.बजाज ऑटो, हिरो मोटो, बीपीसीएल, सन फार्मा सर्वाधिक विक्रीचे शेअर्स आहेत. (Sensex And Nifty Today)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.