Ex-Dividend Stocks Saam TV
बिझनेस

Ex-Dividend Stocks: पुढच्या ५ दिवसांत 'या' स्टॉकमधून मिळेल भरपूर पैसा; वाचा यादी

Ex-Dividend Stocks List: या आठवड्यात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड स्टॉक्स असणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण आठवड्याची यादी माहित करुन घेऊ.

साम टिव्ही ब्युरो

Cheapest Stocks: शेअर मार्केटमध्ये आजकाल सर्वच व्यक्ती गुंतवणूक करण्याचा विचार करतात. मात्र यात नुकसान आणि फायदा या दोन्हीमध्ये रिस्क असते. अशात या आठवड्यात तुम्ही ही रिस्क घेऊ शकता कारण हा आठवडा शेअर बाजारातील गुंतवणूकीसाठी फायद्याचा आहे. या आठवड्यात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड स्टॉक्स असणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण आठवड्याची यादी माहित करुन घेऊ. (Latest Share Market News)

१ शेअरवर मिळेल ५० रुपयांचा फायदा

हा आठवडा शेअर बाजारासाठी फार फायद्याचा आहे. कारण सध्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सना एक्स-डिव्हिडंड मिळत आहे. अदानी ग्रूपचे नाव या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. एक्स-डिव्हिडंड मिळवण्यात आदानी ग्रूपचा शेअर सर्वात पुढे आहे. तसेच एसीसी एक्स-डिव्हिडंड आणि अंबुजा सिमेंट एक्स-डिव्हिडंडचे शेअर्स देखील यात आहेत. आठवडाभरात गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५० रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

सोमवार (३ जुलै)

एक्सटेल इंडस्ट्रीज, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बालाजी एमाईन्स आणि ज्योती लॅबच्या शेअर्सना एक्स-डिव्हिडंड मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी या कंपनीच्या शेअर्सना फायदा मिळू शकतो.

मंगळवार (४ जुलै)

मंगळवारी एक्स-डिव्हिडंड देणार्‍या पुढील कंपन्यांतचा समावेश असू शकतो. पहिले पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर अल्काइल अमाइन्स केमिकल्स, टाइड वॉटर ऑइल आणि अॅग्रो टेक फूड्स या कंपन्यांना मंगळवारी एक्स-डिव्हिडंड मिळू शकतो.

बुधवार (५ जुलै)

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी एमफेसिस शेअर्स एक्स-डिव्हिडंड असतील. बोर्डाने प्रति शेअर ५० रुपयांचा लाभ होऊ शकतो. दीपक स्पिनर्स आणि सुंदरम फायनान्सच्या शेअर्सना ५ जुलै रोजी एक्स-डिव्हिडंड मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवार (६ जुलै)

गुरुवारी एकून चार शेअर्सना एक्स-डिव्हिडंड मिळू शकतो. यामध्ये एलिगंट मार्बल्स अँड ग्रेनी इंडस्ट्रीज, यशो इंडस्ट्रीज, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, आयडीबीआय बँक यांचा समावेश आहे.

शुक्रवार (७ जुलै)

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ७ जुलै रोजी अनेक मोठी नावे एक्स-डिव्हिडंडमध्ये समाविष्ट होणार आहेत. यामध्ये सर्वात मोठं नाव असेलल्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी समूहाचा पहिला शेअर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी केअर रेटिंग, ACC, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि अंबुजा सिमेंट शेअर्सना एक्स-डिव्हिडंड मिळू शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह ठाण्यातील आदिवासी पाड्यावरील दिवाळी उत्सवात सहभागी

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT