Share Market New Record Saam Digital
बिझनेस

Share Market New Record: शेअर बाजारात पैशांचा पाऊस; BSEचं बाजारमूल्य विक्रमी ४ ट्रिलियनच्या पुढे, भारतीय अर्थव्यवस्थेलाही टाकलं मागे

Share Market New Record: भारतीय शेअर बाजाराने नवा विक्रम करत इतिहास घडवला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईच्या बाजारमूल्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत उच्चांक गाठला. हे बाजारमूल्य ४.१ ट्रिलीयन डॉलर किंवा ३,३३,२६,८८१.४९ कोटी रुपये झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Share Market New Record

भारतीय शेअर बाजाराने नवा विक्रम करत इतिहास घडवला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईच्या बाजारमूल्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत उच्चांक गाठला. हे बाजारमूल्य ४.१ ट्रिलीयन डॉलर किंवा ३,३३,२६,८८१.४९ कोटी रुपये झाले आहे, जे भारताच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. तर मंगळवारी शेवटच्या दिवशी अब्जाधीश गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पहायला मिळाली.

४ ट्रिलियन डॉलच्या वाढीसह भारतीय शेअर बाजार सर्वाधिक मूल्य असलेला पाचवा देश बनला आहे. जगातील मोठे मूल्य असलेल्या शेअर मार्केटमध्ये अमेरिका, चिन, जपान आणि हाँगकाँगनंतर आता भारताचा समावेश झाला आहे. गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजारात झपाट्याने वाढ झाली आणि अल्पावधीतच नवीन उच्चांग गाठला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर बाजारात सर्वाधिक मूल्य असलेले देश

अमेरिका ४८ ट्रिलियन डॉलर

चीन १०.७ ट्रिलियन डॉलर

जपान ५.५ ट्रिलियन डॉलर

हाँगकाँग ४.७ ट्रिलियन डॉलर

भारत ४.१ ट्रिलियन डॉलर

एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. जागतीके बँकेनेही यावर विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शेअर बाजाराच्या वाढीवर नजर टाकली तर, दोन वर्षांपूर्वी मे २०२१ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईचे एकूण बाजार मूल्य ३ ट्रिलियन डॉलर होते आता ते ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या ३.७ ट्रिलियन डॉलर असून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. शेअर बाजार देखील पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बीएसई बाजार मूल्य ६०० अब्ज डॉलर पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT