Share Market Saam Tv
बिझनेस

Share Market Closed: पुढच्या आठवड्यात फक्त ३ दिवस सुरु राहणार शेअर मार्केट;४ दिवस सुट्ट्या, कारण काय?

Share Market Close For 4 Days Next Week: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात शेअर मार्केट ४ दिवस बंद असणार आहे. फक्त ३ दिवस शेअर मार्केट सुरु असणार आहे.

Siddhi Hande

पुढच्या आठवड्यात ४ दिवस शेअर मार्केट बंद

फक्त ३ दिवस स्टॉक मार्केट सुरु राहणार

स्टॉक मार्केट बंद राहण्याचे कारण काय?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात फक्त ३ दिवस शेअर मार्केट सुरु असणार आहे. ४ दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पुढच्या आठवड्यात मंगळवारी आणि शुक्रवारी बंद असणार आहे. शनिवार आणि रविवारी शेअर मार्केट बंद असणार आहे.

पुढच्या आठवड्यात ३१ मार्च मंगळवारी महावीर जयंती आहे. तर शुक्रवारी ३ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. या दोन्ही दिवशी शेअर मार्केट बंद असणार आहे. फक्त ३ दिवस ट्रेडिंग होणार आहे. या आठवड्यातदेखील रामनवमीला शेअर मार्केट बंद होते.

२०२६ मध्ये १६ दिवस शेअर मार्केट बंद

२०२६ मध्ये एकूण १६ दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा समावेश आहे. सणांच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि २८ मे रोजी बकरी ईदमुळे शेअर मार्केट बंद असणार आहे. जूनमध्ये मोहरमनिमित्त सुट्टी असणार आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती आणि दसऱ्याला सुट्टी असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे. ख्रिसमसला ट्रेडिंग होणार नाही.

कमोडिटी मार्केटमध्ये MCX म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज महावीर जयंतीनिमित्त बंद असणार आहे. सकाळी ९ ते कालावधीत बंद असणार आहे. संध्याकाळीज ५ ते ११.३० या कालावधीत ट्रेडिंग होणार आहे गुड फ्रायडेच्या दिवशी एमसीएक्स पूर्ण दिवस बंद असणार आहे. त्यामुळे काहीच ट्रेडिंग होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबप रोडवर भीषण आग, शेती आणि झाडांना मोठा फटका

Viral Video: वरातीत नाचताना आयफोन गटारात पडला; पठ्ठ्या थेट घाण पाण्यात उतरला; पाहा व्हिडिओ

Khana Saree Contrast Blouse: लग्नात खणाच्या साडीवर घाला ८ कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज; बजेटमध्ये करा स्टायलिश लूक

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? नेमकं सत्य काय?

Kolhapur : कोल्हापुरात गर्भलिंग निदानाचे रॅकेट उघड; संभाजी शिंदेसह ६ जणांना बेड्या, डॉक्टरचाही समावेश

SCROLL FOR NEXT