Share Market: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं आधी गडगडला नंतर सावरला; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये उसळी

Indian Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या २५% कर घोषणेनंतर भारतीय शेअर बाजार लाल रंगात सुरू झाले आहे, परंतु दुपारपर्यंत तेजी आली. निफ्टी बँक दिवसाच्या नीचांकी पातळीवरून वर आली, जी बाजारातील लवचिकता दर्शवते.
Share Market
Indian Stock Marketsaamtv
Published On
Summary
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली.

  • या घोषणेमुळे बाजाराची सुरुवात लाल चिन्हात झाली.

  • नंतर निफ्टी बँकने इंट्राडेमध्ये जोरदार उसळी घेतली.

  • शेअर बाजाराने दिवसअखेर घसरणीची भरपाई करत स्थिरता दर्शवली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याचं जाहीर केल्यानंतर, भारतीय बेंचमार्क निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. यासह शेअर मार्केट लाल निशाणीसह सुरू झाला. पण नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी उसळी घेत सर्व नुकसान भरून काढलं. दिवसभराच्या व्यवहारात खाली तळाला गेलेल्या निफ्टी बँक निर्देशांक इंट्रा डेमध्ये मोठी उसळी आली. यामुळे भारतीय बाजारावरील डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम कमी होताना दिसत आहे.

Share Market
Konkan Railway: ट्रेनमधून कार कोकणात न्यायचीय? कसं कराल बुकिंग, किती लागेल शुल्क? जाणून घ्या सर्व काही

निफ्टी बँक सकाळी ६०० अंकांपेक्षा जास्त कमी अंकांनी खाली घसरत ५५,५४७ वर आला होता. इंट्रा डे ७५० अंकांनी १.४ टक्क्यांनी उसळी घेत हिरव्या निशाण्यावर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी बँक १८९ अंकांनी घसरून ५५,९६२ वर बंद झाला. या पुनर्प्राप्तीमध्ये खासगी बँकांचा वाटा जास्त होता. यात कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ झाली होती.

Share Market
Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

या शेअर्समध्ये साधरण १ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आलीय. अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदाचे शेअर्स ०.५ टक्क्यांहून अधिक वधारले. आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे किरकोळ वाढीसह हिरव्या रंगात आलेत. पहिल्या तिमाहीत साधरण व्यवहार करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची घसरण आली. फेडरल बँक, इंडसइंड बँक आणि कॅनरा बँकेचे शेअर्स किंचित घसरणीसह लाल निशाण्यावर दिसत आहेत.

बँकेच्या निफ्टीनं महत्तवाची पातळी ओलांडत निर्देशांकात उसळी येईल,अशी शक्यता आहे. हार्दिक मटालिया (डेरिव्हेटिव्ह विश्लेषक, चॉइस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड) म्हणाले, "जर बँक निफ्टी ५६,२७५ च्या वर राहिला तर तो ५७,००० आणि ५७,६३० पर्यंत वाढू शकतो."ब्रॉडर प्राइस फॉर्मेशनमध्ये वाढ होण्याची चिन्हे असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com