बिझनेस

Career News: सर्विसनाऊ युवकांना देणार रोजगारासाठी लागणारं टॅलेंट; विद्यार्थी शिकतील एआयचे धडे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ServiceNow Career News:

सर्विसनाऊ या अग्रगण्य डिजिटल वर्कफ्लो कंपनीने आज शिक्षण मंत्रालयांतर्गत ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्‍युकेशन (एआयसीटीई) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा उद्देश पहिल्या वर्षात १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना सर्विसनाऊ प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण देण्‍याचा आहे. हा सामंजस्य करार धोरणात्मक भागीदारीच्या दिशेने पहिले पाऊल आहे, ज्या अंतर्गत २५,००० विद्यार्थ्‍यांना तीन वर्षांत प्रशिक्षित केले जाईल.(Latest News)

हा सहयोग विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्‍ज कौशल्ये आणि क्षमता प्रदान करण्‍यासह जागतिक आणि केंद्रीकृत शिक्षण देतो. या एमओयूमुळे नाऊ लर्निंग प्लॅटफॉर्मवर सर्विसनाऊ ॲडमिनिस्ट्रेटर आणि डेव्हलपर कोर्सेसमध्ये प्रवेशासह सतत शिकण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच विद्यार्थ्यांना उदयोन्मुख एआय तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल. जी सर्व संभाव्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक माहिती आहे. डिजिटल करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यात मदत करणाऱ्या क्षेत्रातील विशिष्ट कौशल्यांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या एआयसीटीईच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


सर्विसनाऊ आणि पीअरसनच्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, भारतातील १६.२ दशलक्ष (जवळपास १.६ कोटी) कर्मचाऱ्यांनी ऑर्टिफिशियल इंटेलिजन्‍स आणि ऑटोमेशनमध्‍ये रिस्किल व अपस्किल होण्‍याची गरज असेल. याशिवाय, तंत्रज्ञान क्षेत्रात ४.७ दशलक्ष नवीन नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. त्यामुळे डिजिटल युगात व्यावसायिक वाढ आणि प्रगतीसाठी सर्व उद्योगांमध्ये डिजिटल अपस्किलिंग आणि रिस्किलिंग महत्त्वपूर्ण आहे.

सर्विसनाऊ येथील चीफ स्‍ट्रॅटेजी अॅण्‍ड कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर निक झिझॉन नवी दिल्‍लीमध्‍ये एआयसीटीई नेतृत्‍वासोबत भेट घेतल्‍यानंत म्‍हणाले, ''सर्विसनाऊला आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुसज्ज करण्याकरिता एआयसीटीईसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.

सर्विसनाऊमध्‍ये आमचा विश्वास आहे की, डिजिटल परिवर्तनासाठी टॅलेंटमध्‍ये बदल घडवून आणणे आवश्‍यक आहे आणि सर्विसनाऊचा राइजअप प्रोग्राम तरूण अभियंत्यांना रोजगारासाठी तयार क्षमतेसह सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा सामंजस्‍य करार देशभरातील एआयसीटीई संलग्‍न संस्‍थांना पात्र टॅलेंटचा समूह तयार करण्‍यास सक्षम करेल. जे भारतातील भावी तंत्रज्ञान नाविन्‍यतेला चालना देतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT