SEBI introduces new KYC rules and tighter guidelines for IPO grey market premium information. Saam TV
बिझनेस

New KYC Rules : मोठी बातमी! KYC चे नियम बदलले, SEBI चा मोठा निर्णय, आताच घ्या जाणून

SEBI New KYC Rules 2026: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सेबीने केवायसी नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. २४ डिसेंबर २०२६ पासून वारंवार केवायसी करण्याची गरज कमी होणार आहे.

Namdeo Kumbhar

डिमॅट खाते उघडण्यासाठी किंवा इतर प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक सुरू करण्यासाठी वारंवार केवायसी माहिती देण्याची गरज भासणार नाही. कारण, शेअर बाजारातील नियामक संस्था 'सेबी'ने केवायसी (KYC) नियमात ६ महत्त्वाचे बदल केले आहेत. २४ डिसेंबर २०२६ पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. यापुढे गुंतवणूकदारांची अतिरिक्त केवायसी माहिती केआरए (KRA) प्रणालीमध्ये एकाच ठिकाणी साठवली जाईल. त्यामुळे प्रत्येक ब्रोकर किंवा संस्थेकडे वारंवार कागदपत्रे आणि तीच माहिती देण्याची कटकट संपणार आहे.

पुन्हा पुन्हा केवायसीची गरज नाही

सेबीच्या नवीन नियमानुसार, गुंतवणूकदारांना यापुढे प्रत्येक मध्यस्थाला स्वतंत्रपणे नेहमीची अतिरिक्त केवायसी माहिती देण्याची आवश्यकता भासणार नाही. ही माहिती केआरए प्रणालीमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे डिमॅट खाते उघडण्याची आणि गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी होण्याची शक्यता आहे.

मोबाईल नंबर पडताळणीमध्येही दिलासा

दलाल आणि इतर मध्यस्थांना प्रत्येक वेळी मोबाईल नंबर पुन्हा रजिस्टर करण्याची गरज भासणार नाही. जर मोबाईल नंबर केआरएच्या (KRA) नोंदींमध्ये आधीच रजिस्टर केला असेल आणि आधारशी जोडलेला असेल, तर नवीन पडताळणी वगळता येईल. यामुळे गुंतवणूकदारांचा वेळ वाचेल.

एकदा पडताळणी झालेली केवायसी सर्वत्र चालेल

सेबीने केवायसीच्या नियमांत बदल केला आहे. तुमचा पत्ता आणि इतर गरजेची माहिती अधिकृत डेटाबेसवरून आधीच तपासलेली असेल, तर ती केवायसी 'प्रमाणित' मानली जाईल. अशी केवायसी तुम्ही वेगवेगळ्या ब्रोकर किंवा गुंतवणूक संस्थांकडे सहज वापरू शकाल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पुन्हा नव्याने तपासणी करून घेण्याची झंझट राहणार नाही.

खाते बंद झाल्यावरही द्यावी लागणार अपडेट माहिती

गुंतवणूकदाराचे खाते बंद झाल्यास, त्याची माहिती पाच कामाच्या दिवसांत केआरए (KRA) संस्थेला कळवावी, असे आदेश सेबीने ब्रोकर आणि इतर मध्यस्थांना दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे केवायसी (KYC) रेकॉर्ड नेहमी अचूक आणि अपडेट राहण्यास मदत होईल.

IPO च्या 'ग्रे मार्केट प्रीमियम' (GMP) बाबतही SEBI ची कडक भूमिका

आगामी आयपीओच्या (IPO) ग्रे मार्केट प्रीमियमच्या (GMP) प्रचारावरही सेबीने (SEBI) आता लगाम घातला आहे. नोंदणीकृत ब्रोकर आणि शेअर बाजाराशी संबंधित घटकांनी वेबसाइट, ईमेल, एसएमएस किंवा सोशल मीडियावर GMP चे आकडे प्रसिद्ध किंवा शेअर करू नयेत, अशा स्पष्ट सूचना सेबीने दिल्या आहेत. तसेच, GMP च्या आकड्यांवरून शेअर कोणत्या किमतीला लिस्ट होईल किंवा त्यातून नक्की किती परतावा मिळेल, याचा अंदाज बांधून गुंतवणूक करू नये, असा इशाराही सेबीने गुंतवणूकदारांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dapoli Forts : हिवाळ्यात कोकण भटकंतीचा प्लान? दापोलीजवळील 'हे' ८ ऐतिहासिक किल्ले ठरतील बेस्ट डेस्टिनेशन!

IRCTC Scam Case : लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला हायकोर्टाचा मोठा झटका; IRCTC घोटाळा प्रकरणात दिलासा नाहीच!

Maharashtra News Live Update: हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक, आरोग्य विभागाने धाड टाकून केली कारवाई

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार

Akola : नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये १०३ पदांची भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज? वाचा

SCROLL FOR NEXT