Post Office Senior Citizen Saving Scheme Saam TV
बिझनेस

SCSS: निवृत्तीनंतर दर महिन्याला २०,००० मिळवायचेत? या सरकारी योजनेत आजच गुंतवणूक करा

Senior Citizen Saving Scheme: सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपये मिळू शकतात.

Siddhi Hande

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम

सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला मिळणार ठरावीक रक्कम

योजनेत मिळतंय सर्वाधिक व्याजदर

सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्यात आर्थिकदृष्ट्या सुखकर व्हावे, यासाठी प्रत्येकजण आधीपासूनच गुंतवणूक करतात. प्रत्येकजण आपल्या पगारातील ठरावीक रक्कम बाहेर काढतात. जर तुम्ही हीच रक्कम चांगल्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. यामुळे तुम्हाला दर महिन्याला एक ठरावीक रक्कमदेखील मिळू शकतात. दरम्यान, तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला २०,००० रुपयांपर्यंत दर महिन्याला पैसे मिळतात.

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये ६० किंवा जास्त वयोगटातील नागरिक अकाउंट उघडू शखतात. ५५ ते ६० वर्षात निवृत्त झालेले नागरिकदेखील अकाउंट उघडू शकतात. तसेच वीआरएस घेतलेले नागरिकांसाठीही ही योजना लागू आहे.

या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. सिंगल अकाउंटसाठी कमाल ३० लाख तर जॉइंट अकाउंटसाठी कमाल ६० लाख रुपये गुंतवणूक शकतात. या योजनेचा मॅच्युरीटी कालावधी ५ वर्षांचा आहे. यानंतर तुम्ही ३ वर्षांसाटी वाढवू शकतात.

व्याजदर

या योजनेत सध्या व्याजदर ८.२ टक्के आहे. व्याजदर प्रत्येक तिमाही आधारावर तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस अकाउंटमध्ये जमा होतात.

जर एखादा व्यक्ती १५ लाख रुपये गुंतवणूक करत असेल तर ८.२ टक्के व्याजदराने त्याला १,२३,०० रुपये वर्षाला मिळतील. म्हणजेच महिन्याला ११,५७० रुपये मिळतील. या योजनेतील व्याजदर कमी-जास्त होत असते.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्समध्येही सूट मिळते.तुम्हाला कलम 80C अंतर्गत १ लाखांवर टॅक्स भरावा लागत नाही. याचसोबत या योजनेत जर वर्षाला ५० हजारांपेक्षा जास्त व्याजदर असेल तरच टीडीएस कापला जाणार आहे. जर गुंतवणूकदार ५ वर्षांआधी पैसे काढत असेल तर त्याला दंड भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी

ICC Women's World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार पुरुषांपेक्षाही जास्त बक्षीस, किती मिळणार प्राइस मनी?

Local Body Elections : महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; वारे बदलले, शिंदेंच्या शिवसेनेचा शिर्डीत भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू अमरावती जिल्ह्यात दाखल, शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत

Face Care: थंडीने गाल रखरखीत झालेत? मग त्वचा मुलायम होण्यासाठी आजच हे ३ घरगुती उपाय वापरून पाहा

SCROLL FOR NEXT