SIP Calculation: महिन्याला ₹४००० ची गुंतवणूक, १५ वर्षांनी किती फंड तयार होईल, जाणून घ्या गणित

Mutual Funds: दर महिन्याला ४ हजार रुपये गुंतवून १५ वर्षांत किती फंड तयार होईल हे जाणून घ्या. मिड कॅप, लार्ज कॅप फंड आणि SIP कॅलक्युलेशनबाबत तज्ज्ञ सल्ला मिळवा.
SIP Calculation
Mutual Fundssaam tv
Published On

आजच्या काळात बरेच लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडतात. छोट्या-छोट्या हप्त्यांद्वारे मोठी गुंतवणूक तयार करण्याचा हा एक उत्तम मार्ग मानला जातो. जर तुम्हीही एसआयपी सुरू करण्याचा विचार करत असाल, तर पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरेल.

कॅलक्युलेशननुसार फंड किती तयार होईल?

जर तुम्ही दर महिन्याला ४,००० रुपयांची एसआयपी करत असाल, तर १५ वर्षांनी १२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास एकूण २० लाख १८ हजार रुपये तयार होतात. या कालावधीत तुमचं एकूण मूळ भांडवल म्हणजेच ७ लाख २० हजार रुपये असेल, आणि उरलेली रक्कम म्हणजेच सुमारे १३ लाख रुपये हा नफा असेल.

SIP Calculation
Phaltan Tourism: नयनरम्य निसर्ग अन् थंड ठिकाण... फलटणपासून फक्त 50 किमीवर वसलेत 'हे' सुंदर Hidden स्पॉट्स, एकदा पाहाच

योग्य फंड कसा निवडावा?

एसआयपी सुरू करण्यापूर्वी सर्वात मोठा प्रश्न असतो. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी? अनेक गुंतवणूकदार फक्त जास्त परतावा देणारा फंड निवडतात, पण तज्ज्ञ सांगतात की फक्त रिटर्न पाहून निर्णय घेऊ नये. त्याऐवजी फंडचा रिस्क फॅक्टर, एक्स्पेन्स रेशो, आणि एग्जिट लोड या महत्त्वाच्या बाबींकडेही लक्ष दिलं पाहिजे.

मिड कॅप फंड म्हणजे काय?

या संदर्भात यूटीआय एएमसीचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि फंड मॅनेजर विशाल चोप्रा यांनी सांगितले की, मिड कॅप फंड हे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्या अजूनही वाढीच्या टप्प्यात आहेत. या कंपन्यांचा व्यवसाय आणि महसूल हळूहळू पण स्थिर वाढतो. त्यामुळे या फंडना स्थिर परतावा आणि moderate risk मिळते.

लार्ज कॅप फंडच्या तुलनेत मिड कॅप फंडमध्ये थोडी अधिक जोखीम असते, पण स्मॉल कॅपच्या तुलनेत ती कमी असते. म्हणजेच, गुंतवणुकीत स्थिर वाढ हवी आणि जोखीम थोडी मर्यादित ठेवायची असेल. तर मिड कॅप फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो. शेवटी, कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दर महिन्याला थोडं-थोडं गुंतविल्यास दीर्घकाळात मोठं भांडवल तयार होऊ शकतं.

SIP Calculation
Diabetes Symptoms: सतत भूक लागते अन् थकवाही जाणवतोय? ही लक्षणे असू शकतात डायबिटीजची

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com